"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Wednesday, 21 January 2015
माझी "मधुशाला" (हिन्दी कविता)
कुछ दिनों पहले श्री अमिताभ बच्चन जी के मुख से उन्हीं के पिताजी श्री हरिवंशराय बच्चन जी की प्रसिद्ध कविता "मधुशाला" की पंक्तियाँ सुनी.. अद्भुत एवम् गहन अर्थ से परिपूर्ण.. सुनते ही मेरे अंदर बैठा कवि भी मानो अपने आप ही बोल उठा कि..
अमिताभ जी ..
न कभी गया मैं मदिरालय में..
न कभी छुआ मद का प्याला..
किन्तु नशे में हूँ मैं महोदय..
सुन रहा हूँ जो मधुशाला..
नशा चढ़ा कैसा ये अद्भुत..
बेहॅक गया मैं भोलाभाला..
हर पंक्ति सुन मधुशाला की..
लगे पी गया मदिराला..
सुना मनाती होली प्रतिदिन..
रात दिवाली मधुशाला..
मधुशाला सुनकर के महोदय..
मान गया मैं मतवाला..
लगे रातभर पीता रहूँ मैं..
मधुशाला का प्रति प्याला..
नशा भला ये मुझको लगता..
मन-जागृत करने वाला..
रस ऐसा है मधुशाला का..
ना भटके कभी पीने वाला..
साक़ी छोड़ मदिरालय को..
मद से मधुर है मधुशाला..
मदिरा जीवन ब़दतर करती..
विष का जैसे हर प्याला..
संदेश जीवन का घोल पिलाती..
राह दिखाती मधुशाला..
-भूषण जोशी (दिनांक -१९/१/२०१५)
Saturday, 17 January 2015
आलो जवळ तरी का आपण..
"आलो जवळ तरी का आपण.."
आलो जवळ तरी का आपण..
न भेटुनी कधी जरी..
सदा गुंतलो आणि हरपलो..
पार खोल मनी अंतरी..
नकळत आयुष्यात अलीस तू..
नकळत माझी झालीस तू..
न कधी मज भेटलीस तू..
न कधी मज दिसलीस तू...
न कधी तुज पाहिले ग मी..
न कधी तुज स्पर्षिले ग मी..
सदा तुज ऐकिले ग मी..
सदा तुज बोलले ग मी..
सदा तुज लिहिले ग मी..
सदा तुज वाचिले ग मी..
कल्पनेत तुज आणले ग मी..
स्वप्नात तुज कल्पिले ग मी..
खरी असली तरी कल्पनाच तू..
माझ्यातली प्रेम भावनाच तू..
न जीवनभराची साथ आपुली..
न पति-पत्नीची जात आपुली..
आवड तरी ही तुच माझी..
निवड तरी ही तुच माझी..
न भेटलीस मज जरी तू..
तरी राहशील तुच माझी..
-भूषण जोशी
Monday, 5 January 2015
लेख- एक विचार.. राष्ट्रमाता कोण?
एक विचार.. राष्ट्रमाता कोण?
मित्रांनो महात्मा गांधींना "राष्ट्रपिता" म्हणून संबोधलं जाते. अश्या वेळेला बहोतेकांना प्रश्न पडतो की जर महात्मा गांधी हे "राष्ट्रपिता" आहेत तर मग "राष्ट्रमाता" कुणाला म्हणावं? बरेच लोक आपापल्या विचारानुसार कुणाला न कुणाला राष्ट्रमाता मानत असतात किंवा आहेत. पण मला असं वाटतं कि जर देशासाठी झुंझणार्याला ही पदवी मिळू शकते तर मग आपल्या बाळाला देश-रक्षणा साठी सीमेवर पाठवणार्या त्या "आई" ला "राष्ट्रमाता" का म्हणू नये? राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि असे कित्येक उदाहरणं आपल्याला इतिहासात पहायला वाचायला मिळतात. ह्या विरांगना स्वतःच्या बाळा सहित युद्धात उतरल्या होत्या. त्या काळातल्या राष्ट्रमाताच म्हणावं त्यांना.. असेच आजच्या काळातल्या "राष्ट्रमाता" ह्या त्या वीर सैनिकांच्या जननीच आहेत जे सैनिक सीमेवर शत्रूंशी लढता-लढता आपले प्राण सुद्धा गमावतात. प्रत्येक स्त्री साठी तिचं लेकरू हेच तिचे प्राण असते. पण ह्या वीर माता त्यांच्या पोटाचा गोळा हसत-हसत देशावर ओवाळून टकतात. माणूस एक वेळ स्वतःला मरणात लोटू शकतो पण आपल्या बाळाला नाही. ह्यावरूनच ह्या वीर मात्यांचे त्याग किती महान आहे ह्याची प्रचेति आपल्याला येते. अश्या महत्त्यागिनींना "राष्ट्रमाता" म्हणून संबोधणे सर्वथा योग्य आहे असे माला वाटते. सीमेवर लढणार्या प्रत्येक सैनिकाची आई ही त्या देशाच्या देशवासियां साठी राष्ट्रमाताच आहे, कारण तिचं लेकरू त्यांच्या रक्षणा साठी सीमेवर उभं असते म्हणून ते देशात सुखानी नांदू शकता. तेव्हा माझ्या मते तरी देशासाठी लढणारा प्रत्येक जण हा राष्ट्रपिता आणि देशावर हसत-हसत आपलं लेकरू ओवाळून टाकणारी प्रत्येक आई ही राष्ट्रमाताच आहे.
-भूषण जोशी
दिनांक : ०५-०१-२०१५
"जाता जाता ऐसे जावे.."
"जाता जाता ऐसे जावे.."
बोलता बोलता ऐसे बोलावे..
ऐकूनी जीवन मधुर बनावे..
गाता गाता ऐसे गावे..
श्वासाचे ही गीत व्हावे..
लढता लढता ऐसे लढावे..
शत्रूने ही भक्त बनावे..
देता देता ऐसे द्यावे..
घेणार्याचे ओंजळ फाटावे..
भजता भजता ऐसे भजावे..
देवाने साक्षात् अवतरावे..
हसता हसता ऐसे हसावे..
दुःखाने ही बघत रहावे..
बनता बनता ऐसे बनावे..
अवघ्या देशाने गर्व करावे..
जगता जगता ऐसे जगावे..
मरणाने ही नेतांना रडावे..
जाता जाता ऐसे जावे..
अवघ्या जगाने मुजरा घालावे..
-भूषण जोशी
लेख - "काय भूषण!! नवीन वर्ष कसा साजरा केलास?
काही परिचित विचारत आहेत मला- "काय भूषण!! नवीन वर्ष कसा साजरा केलास? पार्टी कशी झाली?"
त्यांचे प्रश्न योग्य आहेत पण आता त्यांना कसे सांगावे कि आमच्या करता
नवीन वर्ष म्हणजे फक्त भिंतीवरचं जुनं Calender काढायचं आणि नवीन लावायचं.
मद्यपान आम्ही करत नाही, मांसाहार चालत नाही, DJ ची किंवा डिस्को ची हाउस
नाही, आई-वडिलांचा आशिर्वाद घेतला आणि नवीन वर्षात प्रवेश केला. आई ने
शेवया ची खीर केली होती त्यानेच तोंड गोड करून २०१४ ला bye-bye केलं.
देवाला प्रार्थना केली कि बाबा हे नवीन वर्ष आम्हा सगळ्यांना सुखाचं,
समाधानाचं, समृद्धीचं आणि शांततेत जावो असा आशिर्वाद दे. पण समाधान एवढच
आहे कि ह्या नवीन वर्षात मी सहकुटुंब सुखरूप प्रवेश केला. आणि मला वाटते कि
ह्या पेक्षा जास्त महत्वाचा असं दुसरं काहीच नसते. उगाच धिंगाणा घालण्यात
काय अर्थं आहे.
-भूषण जोशी
(दिनांक ०१-०१-२०१५)
"नूतन-वर्षाभिनंदन.."
"नूतन-वर्षाभिनंदन.."
हसत हसत हे वर्ष जावे..
नाचत-कुदत नव-वर्ष यावे..
सहकुटुंब नवीन वर्षाच्या..
स्वागतास सगळ्यांनी यावे..
नूतन वर्षी नव्या जोमाने..
नवे कार्य सिद्धीस आणावे..
विश्व-शांती स्थापित व्हावी
देवास ऐसे प्रार्थ करावे..
शुभाषिश शुभ वर्ष नवे हे..
आनंदी सगळ्यांना जावे..
अपूर्ण जया इच्छा असल्या..
ह्या वर्षी पूर्णत्वास आणावे..
माथ्यावर लावुनी यश-चंदन..
गत वर्षाला करुनी वंदन..
भूषण सहृदय सगळ्यांना..
करितो नूतन-वर्षाभिनंदन..
-भूषण जोशी
Subscribe to:
Posts (Atom)