Sunday, 30 November 2014

"साली आधी घरवाली" वाह वाह.. हा हा हा.. "दिर अर्धे पती परमेश्वर"????? काय? काय बोलतेस? लाज नाही वाटत?

"साली आधी घरवाली" वाह वाह.. हा हा हा.. "दिर अर्धे पती परमेश्वर"????? काय? काय बोलतेस? लाज नाही वाटत?

शीर्षक वाचून आपणा सर्वांस कळाले असेनच कि मुद्दा काय आहे. दुहेरी व्यक्तिमत्वाचा आपला हा समाज एकी कडे नवरात्रोत्सवी ९ देव्यांची पूजा सेवा करित असतो पण जी देवी मनुष्य रुपात ह्या समाजात वावरते तिचं मात्र मानसिक खच्चीकरण केलं जाते. तिला अक्षरशः वस्तू असल्या सारखे वागवले जाते. तिच्या मनाचा आणि भावनांचा अजिबात विचार केला जात नाही. असाच एक मुद्दा म्हणजे लग्न झाल्या नंतर किंवा लग्नात पुरुष मंडळी आपल्या मित्रां समोर आपल्या बायकोच्या बहिणीला "साली आधी घरवाली" असे संबोधतात आणि मित्र सुद्धा ह्या फालतू व्यंगाचा फार कौतुकाने ही ही हा हा करत आनंद घेतात. अश्या वेळेस बायकोच्या मनाला कसे वाटत असेन ह्याचा विचार केला जात नाही. मुद्दा जरी चेष्टा करण्या इतपत लहान असला तरीही अशी चेष्टा बायकोने तिच्या दिरा बद्दल केलेली सहन केली जात नाही. तिला उलट प्रश्न विचारले जातात. तिच्या कडे शंकेच्या दृष्टीने बघितले जाते. पार तिच्या चारित्र्या वरच आक्षेप घेतला जातो. असे भेदभाव का? मर्यादा काय फक्त बायकान साठीच असते का? "साली अर्धी घरवाली" असे विधान करतांना बायकोच्या मनाचा जर का विचार होत नसेल तर नवर्याचा भाऊ म्हणजे "दिर अर्धे पती परमेश्वर" असे विधान बायकोनि केल्यास काही ही चुकीचे नाही.. संस्कृती ही दोघांची मग त्यातले बंधनं हे फक्त बायकोलाच का? संस्कार दोघांवर बरोबर होतात.. मग पुरुषांनी समाजात कसे ही वागले तरी ते बरोबर आणि बायकांनि मात्र घराचा उंबरठा जरी ओलांडला तरी ही कहर होतो.. ज्या समाजात देवताच नव्हे तर देवींचि सुद्धा पूजा होते त्या समाजात घरातल्य स्त्रीला मात्र वस्तू प्रमाणे वागवले जाते.. माझ्या नजरे हे पुर्णपणे अनुचित आहे. आज स्त्री-पुरुष समानता ऐसे तत्वज्ञान आपण ऐकत असतो पण ह्यावर अमल किती वेळा करतो ह्याचा विचार केला आहे का कुणी?

Saturday, 29 November 2014

"शुभ प्रभात.."

"शुभ प्रभात.." 

 

दिवस उगविला झाली पहाट..
अंगी भरते थंडीची लाट..
गोड उन्हाची बघता वाट..
सूर्य उगवला सुंदर विराट..

 

धुंद हिवाळी आहे उन्हात..
स्पर्शुनी जणू पडलो मी सुखात..
कोकिळेच्या त्या मधुर स्वरात..
जणू पाखरे ही होती गात..

 

सडा घालीते आई अंगणात..
दृश्य सुंदर रमलो पहात..
नकळत शब्द येई मुखात..
निसर्ग जणू वसला हृदयात..

 

उठा मित्रहो संपली की रात..
उठा नव्याने करा सुरुवात..
देवापाशी जोडुनी हात..
करा खरे जे दिसे स्वप्नात..

 

राहो आनंदी तुम्ही जगात..
प्रेम तुमच्या असो मनात..
दिवस तुमचा जावो हर्षात..
तुम्हा सगळ्यांना शुभ प्रभात..
तुम्हा सगळ्यांना शुभ प्रभात..

                                                                    -भूषण जोशी

Friday, 28 November 2014

"गुंतू नये माणसात.."

"गुंतू नये माणसात.."

 

गुंतू नये माणसात,

जीव लावावे देवात,

माणूस सदा रहात नाही,

देव सोडुनी जात नाही,

किती ही पूजिले माणसा तरी,

देव त्याचा होत नाही,

का म्हणूनी सहन करावी,

विरहाची यातना ही?

तोडुनी जातो हृदय जो,

मोल त्यास रहात नाही,

स्त्री असो वा तो पुरुष,

माणुसकी ही त्यात नाही,

प्रेम करुनी देवास बघावे,

गुंतुनी त्याच्यात पहावे,

आनंद अफाट सागर तो,

मनसोक्त जया पोहत जावे,

प्रेम हे अनमोल ज्याला,

देवात लावुनी सार्थ करावे,

देव म्हणजे कोण आता?

तोच रे जो जन्मदाता!!

दोन रुपात नांदी जगी जो,

पिता तुझा नि तुझीच माता..

पिता तुझा नि तुझीच माता..

                                                            -भूषण जोशी

"आभार तुझे.."

"आभार तुझे.."


कैसे मानू आभार तुझे,

किती ग मन हे उदार तुझे,

जैसे सुंदर नाम तुझे,

तैसेच सार्थक काम तुझे,

गोड छवी तुझी हसत-मुखी तू,

शब्दांची ग छान सखी तू,

तुझ्याच प्रेरणी लिहितो मी पण,

कविता करतो नसूनी कवी पण,

अनोळखी तरी दिले प्रोत्साहन,

अंकुरास मिळते जणू जीवन,

रचना पहिली तुझ्याच साठी,

दुसरी ही करतो तुझ अर्पण,

कमीच वाटे लिहिल किती तरी,

एवढे मनी उपकार तुझे,

देवा चरणी हीच प्रार्थना,

होवो हित-स्वप्न साकार तुझे,

कैसे मानू आभार तुझे,

किती ग मन हे उदार तुझे..

                                                    -भूषण जोशी

"तुझ्याच साठी"

"तुझ्याच साठी"

 

कविता ही ग तुझ्याच साठी, 

नव-सरिता ही ग तुझ्याच साठी,

सखी नवी तूज अर्पण करितो.. 

रचना ही मज तुझ्याच साठी..


कधी नव्हे देखिले तुला मी,

सखी सदा ऐकिले तुला मी,

मधुर सखी आवाज तुझा,

साधा सुन्दर अंदाज तुझा, 

मैत्रीच्या ह्या रेशीम गाठी,

हृदयी ओविले तुझ्याच साठी..


दोघांना आवडे कला,

संगीत तुला, संगीत मला,

सप्तसुरांशी खेळतेस तू,

सप्तसुरांना जोडतेस तू,

गायनात मिळतो तुझला रस,

एवढीच मागणी तुला बस,

नाते तुझे हे तोडू नकोस,

संगीत कधी तू सोडू नको,

यश प्रसिद्धी लाभो तुजला,

आणखी नको काही मजला,

शब्दास जागुनी रचल्या मी,

ओळी सखी ह्या तुझ्याच साठी,


कविता ही ग तुझ्याच साठी..

नव-सरिता ही ग तुझ्याच साठी..

  सखी नवी तूज अर्पण करितो.. 

                    रचना ही मज तुझ्याच साठी..                                                                                                           -भूषण जोशी

"मानुसकी चा जन्म.."

 

"मानुसकी चा जन्म.."

 

जाणे का जीवनी मानसा..
क्रोध ओढुनी घेतोस तू..
क्षणिक दुखाच्या वेदने पायी..
जन्माचे नाते तोडीतोस तू..

 

अहंकार पैसा समृद्धी..
शत्रू ऐसे पाळतोस तू..
आहारी जावूनी जयाच्या..
मानुसकी का जाळतोस तू..

 

अंत काळी सोडुनी सगळे..
जाशील यम नगरी तू..
सांभाळशील कैसे तुझ्या ह्या..
पापाने छळकत्या घागरी तू..

 

असत एवढ ज्ञान मानसा..
का मानुस तो म्हणावा..
उदारता जर अनंत असती..
देवच त्याचा करावा...

 

राग लोभ सोडून जाणे..
मरताना सगळेच येथे..
जाण होते ज्यास ह्याची..
मानुसकी जनमते तेथे...

 

जाण होते ज्यास ह्याची..
मानुसकी जनमते तेथे..

                                                           -भूषन जोशी

"लेखणी"

माझी ही रचना सगळ्याच लेखकांना समर्पित आहे.. आपण सगळे खूप छान लिहिता.. असेच लिहित रहा.. धन्यवाद.. __/|\__

 

"लेखणी"

 

घे हाती कलम तू..
सागर ही बनेल शाई..
लिहिले जरी तू काही..
तुझ रोखणार नाही..

 

आहे सुंदर साजरी..
तुझी लेखणाई..
शब्द-पुष्प फुलते जणू..
मनी अंगणाई..

 

तेजस्वी लेखणी तुझी ही..
पसरवी रोशनाई..
अजाणतेच्या अंधकातून..
ज्ञानप्रकाशी नेई..

 

का हवे शस्त्र तुझला..
का हवी बळीष्ठायी..
कलम तुझी कुठल्याही..
शस्त्रा वाणीच धारदायी..

 

निंदकास करू दे निंदा..
शत्रू शी कर लढाई..
कर प्रहार शब्दांचे ऐसे..
भले भले चाटतील भूई..

 

कर लेखणी जग बदलाया..
कर जगणे फळदाई..
जग बदलुनी जग सुंदर बनले..
ह्यातच तुझी पुण्याई..

 

पर शब्दांचे लाव मनाला..
गाठ विचार उँचाई..
वैचारिक मंथन कर गुंजन..
सत्य सदा तू गाई..

 

हो प्रसिद्ध लेखणी तुझी..
वरदे तुझ शारदाई..
ठरो तुझी लेखणी माणसा..
बहु प्रेरणा-दाई..

 

ठरो तुझी लेखणी माणसा..
बहु प्रेरणा-दाई..

                                                      -भूषण जोशी