Monday 30 May 2016

माझा पांडुरंग हरी..

भक्ति करी भक्तापरि..
चंद्रभागेचीया तिरी..
असे उभा विटेवरी..
माझा पांडुरंग हरी..

भेट साधुनिया त्याची..
मिळे आनंद आत्म्याला..
हरतो सारे विकार..
ऐसा प्रभू निरंकार..

माझ्या मुखातही तोच..
माझ्या मनातही तोच..
माझ्या देहातही तोच..
जगाचीया कारभारी..

जपतो मी सदा त्याला..
भजतो मी सदा त्याला..
पुजतो मी सदा त्याला..
करितो मी त्याची वारी..

कधी मागे ना तो मला..
कधी सांगे ना तो मला..
द्यावयाचे मी तयाला..
जगी काय असे भारी..

अवघे जग तयाचे..
माझे प्राणही तयाचे..
नाचे सृष्टी तया बोटी..
साऱ्या जगाचा मदारी..

मन शांत होते तिथे..
माझा हरी नांदे जिथे..
नतमस्तकी होतो मी..
फक्तं तया दरबारी..

-भूषण जोशी