Thursday 29 January 2015

"एक प्रामाणिक सल्ला.."

"एक प्रामाणिक सल्ला.."

 

एक प्रामाणिक सल्ला देतो.. लग्न अतिशय साध्या पद्धतीने करावे.. आधी कोर्ट मॅरेज करून घ्यावे.. मग काही निवडक पाहुणे मंडळीं सोबत एखाद्या मंदिरात किंवा कार्यालयात विधिवत् लग्न लावावे, आणि नंतर आपल्या इतर नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना एक छान असं रिसेप्षन (Reception) द्यावं. तसे ही आजकाल विधिवत् लग्न झाल्या नंतर ही मॅरेज सर्टिफिकेट साठी कोर्टात जावच लागते, मग ही औपचारिकता आधीच करून घ्यावी. ह्यात पैसे ही वाचतात, संबंध ही वाचतात, शिवाय फॉरमॅलिटीस(Formalities) ही पुर्ण होतात. उगाच लग्नाचा तमाशा करून वधू पक्षावर आर्थिक दडपण का टाकावे? लग्न समारंभात खर्च होणारा पैसा भविष्या साठी साठवून ठेवला तर अडी-अडचणी आल्यावर कामास पडू शकतो. लग्न म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबीयांचे मिलन. ते शांततेत आणि निश्चिंत पणे पार पडले पाहिजे. उगाच बाहेरच्यांचे रुसवे फुगवे सांभाळत बसावे लागते. कुणाला जेवण नाही आवडलं, तर कुणी नवरा-नवरी पाया नाही पडलेत म्हणून फुगतात, तर कुणी तर जसे काय आहेर घ्यायला म्हणून आलेले असतात आणि घाई गडबडीत वधू पक्ष आहेर द्यायचा विसरले तर फुगून बसतात, तर कुणी मान नाही मिळाला म्हणून रुसतात. आणि बरेच किरकोळ कारणं असतात ह्या विघ्न-संतोषी नातेवाईकां कडे लग्नाच्या गोडव्यात मीठाचा खडा पाडण्याचे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे ते राहतात बाजूलाच आणि ह्या आमंत्रितान्चेच चोचले पुरवावे लागतात. लग्नात पोट भर जेवण केल्या नंतर सुद्धा फक्त लाडू-चिवड्याची पुडी नाही दिली म्हणून आयुष्यभराचे संबंध तोडणारे डोकेफिरू नातेवाईक ही असतात. अश्या लोकांना आमंत्रण देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्या पेक्षा चार साक्षीदारान समोर कोर्ट मॅरेज करण्यात काही ही गैर नाही.

-भूषण जोशी

दिनांक -२९/०१/२०१५

Friday 23 January 2015

"नको देखावा.."

"नको देखावा.."

देव विचारी भक्ताला..
कैसा तुझा भक्तिचा ठेवा..
श्रद्धा-शूण्य तुझी भक्ति रे..
कसा मिळेल कृपेचा मेवा..

 

निज-स्वार्थ सदा साधुनिया..
करतो नित दैवी देखावा..
फसवूनी जन भावना अपेक्षा..
इच्छीतोस तुज राज्य मिळावा..

 

नको तुझे पैसे अन लाडू..
मज नाहि वस्तूंचा हेवा..
शुद्ध मनी श्रद्धेने पूरीत..
एकदाच मज स्मरण करावा..

                                                             -भूषण जोशी

Thursday 22 January 2015

"मित्र असा नसावा.."

"मित्र असा नसावा.."

एकदा जुना मित्र भेटला..
जवळ येऊनी मला खेटला..

काय कसा आहेस? बर्याच दिवसानी?
प्रश्न मारिले नेमुनी त्यानी ..

बरा आहे.. निवांत आहे..
उत्तरलो मी त्यास ऐकूनी..

तू कसा आहेस? काय करतोस?
हर्षित मनाने मी प्रश्न केले..

चमकला चेहरा त्याचा सूर्या वानी..
सुंदर हास्य त्याच्या मुखी आले..

मोठ्या कंपनीत रोजगार आहे..
मला ५०,००० पगार आहे..

नुकताच फ्लॅट बुक करून आलो..
नवीन गाडी ही तयार आहे..

सांगू लागला मग ऐठीत तो..
घेउ लागला मज मिठीत तो..

मला ही जाणुनी आनंद झाला..
मी ही हसून त्याच्या मिठीत आला..

तुझं काय चालू आहे भावा..
घेतलास का नाही बंगला नवा..

हसलो मी त्याचे प्रश्न ऐकूनी..
बोललो अरे आलोय जग जिंकुनी..

ऐकून चकित जरा तो झाला..
"खरं बोल" मला तो म्हणाला..

थट्टा करतोय रे मी तुझी..
नोकरी सोडलीये मी माझी..

ऐकूनी तो जरा शांत झाला..
जणू काही तेथे एकांत झाला..

मग काय करतोय आजकाल तू?
झालायेस का घराचा द्वारपाल तू?

हसलो मी पण गम्मत समझुन..
हो रे म्हणालो हात बांधून..

तितक्यात एक बदल झाला..
दोन पाउलं तो मागे गेला..

रिकामा आणि बेकार आहेस तू ?
का अजून बेरोजगार आहेस तू..?

एका मागून एक जणू बाण खुपसले..
हृदय जणू पचकन पिचकले..

हो रे भावा असच समझ तू..
गरिबीत ह्या माझी गरज तू..

जाणे अचानक त्यास काय झाले..
जाणे कुणाचे फोन आले..

हात त्यानी माझा झटकला..
पाठ दाखवून लगेच सटकला..

तेथेच उभा राहिला मी..
त्याला जातांना पहिला मी..

काय जाणे त्यास काय वाटले..
पण माझे तर हात पाय दाटले..

तुटलेलं हृदय मोडलेलं मन मी वेचलं..
स्वतःला निराशेतून बाहेर खेचलं..

असा तो का वागला काहीच कळेना..
प्रश्न बरेच पण उत्तर मिळेना..

कोठे त्याला घ्यायची भरारी होती ?
त्याला पळवणारी काय माझी बेकारी होती ?

खरं सांगितलं म्हणून का तू पळाला?
का मग माझा जीव जळाला?

अरे तुला काही मी मागत नवतो..
माझी व्यथा तुला मी सांगत होतो..

असो रहा सुखी दोष नाही रे तुझा..
दोषी स्वाभिमान असंतोष हा माझा..

नसता भेटलास तरी चाललं असतं..
मन माझं अस दुखावलं नसतं..

                                                                         -भूषण जोशी

प्रेम म्हणजे खेळ असतं..

प्रेम म्हणजे खेळ असतं..

 

सहज बंध तोडिलेस तू..
सहज मला सोडिलेस तू..
हृदयात ज्या तुज ठेविले..
सहज कसे मोडिलेस तू..

 

असो दैव माझेच हे..
चुकून तुज प्रेम दिले मी..
तुझ्या सरळ भावात गं..
रूप साधे देखिले मी..

 

खेळशील हृदयाशी ऐसे..
कल्पनाच न केली कधी..
प्रेम म्हणजे खेळ असतं..
ठाउक नवतं ह्या अधी..

                                                          -भूषण जोशी

Wednesday 21 January 2015

हिन्दी कविता- "नये साल में.."

"नये साल में.."

 

नज़ारा बदल जाएगा..
शायद नये साल में..

बिगड़ा सुधर जाएगा..
शायद नये साल में..

 

गरीबी हट जाएगी..
शायद नये साल में..

बदक़िस्मती सिमट जाएगी..
शायद नये साल में..

 

ख़ुशहाली लिपट जाएगी..
शायद नये साल में..

क़िस्मत चमक जाएगी..
शायद नये साल में..

 

रोज़गार मिल जाएगा..
शायद नये साल में..

नौकरी का फुल खिल जाएगा.
शायद नये साल में..

 

आशाएं कई हैं इस नये साल में..
उम्मीदें नयी है इस नये साल में..
जाने क्या होगा इस नये साल में..
जो होगा अच्छा ही होगा इस नये साल में..

                                                                                 -भूषण जोशी

गणपती का गजमानव?

गणपती का गजमानव?

A Norwegian Woman Gives Birth To Baby Elephant!

 

मित्रांनो बर्याच हिंदू धार्मिकाँ साठी नॉर्वे (Norway) हे एक तीर्थ स्थळ झालय. ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एका नॉर्वेजियन (Norwegian) दांपत्त्याने एका अश्या बाळाला जन्म दिला आहे जो अर्धा हत्ती आणि अर्धा मानव असा आहे. बरेच भारतीय आणि हिंदू श्रद्धाळू त्यांच्या घरा समोर गर्दी करत आहेत. कारण दिसायला ते बाळ अगदी हुबेहुब "गणपती" सारखं दिसत आहे. आपण सगळेच जाणतात की गणपती बाप्पा सुद्धा गज आणि मानव ह्यांचं मिश्र स्वरूप आहेत. आणि अश्या ह्या गजाननाची भारतात सर्वत्र पूजा होते. त्या मुळे भारतीय गणेश भक्त तर ह्याला जणू गणपती चा अवतारच मानत आहेत. एनडरसन (Anderson) दांपत्ती भारतात सेलेब्रिटी झाले आहेत. पण ज्या एनडरसन दांपत्ती च्या घरी असं अद्भुत बाळ जन्माला आलं आहे त्यांना मात्र ह्या सगळ्याचा त्रास होऊ लागला आहे. कारण वास्तविकतेत ते बाळ शारीरिक विकृतीचे उदाहरण आहे असं त्यांचं मत आहे.

 

तिथल्या पत्रकारांशी बोलताना लोला एनडरसन (Lola Anderson) म्हणाल्या -"ह्या लोकांनी माझ्या घरा समोर गर्दी करणे बंद करावे अशी माझी इच्छा आहे. ते आम्हाला एकटं का नाही सोडत? आम्ही आधीच खूप सहन करत आहोत. माझं बाळ एका हत्ती सारखं दिसतं आणि ह्याहून ही वाईट म्हणजे त्याचं देह एखाद्या आल्या सारखं आहे. आता जर का ह्या लोकांनी आणखीन काही देण्याचा प्रयत्न केला तर मी ते त्यांच्या तोंडावर फेकून मारेन."

जेव्हा त्या बाळाच्या नावा बद्दल विचारले तेव्हा त्याचे वडील अलेग्ज़ॅंडर वैतागून म्हणाले- "आम्ही ह्याला अजून कुठलंच नाव दिलेलं नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही ह्याला फक्त एक असा जीव म्हणतो ज्याला आपण आपल्या तळघरात ठेवतो. आम्ही ह्याला आमच्या तळघरातच ठेवणार आहोत आणि रस्त्यावरून जे आम्ही गोळा केलं आहे तेच ह्याला खायला देणार आहोत. हे बघता काही नवीन विकल्प सुद्धा समोर दिसत आहेत. बहुदा आम्ही ह्याला भारताला विकून टाकू. ते बहोतेक ह्याला ताज-महालात ठेवतील."

 

मित्रांनो हेच बाळ जर भारतात जन्मलं असतं तर कदाचित त्या दांपत्त्याला लोकांनी मंदिरात नेउन बसवलं असतं किंवा त्यांच्या घराचंच मंदीर केलं असतं. गणपती आपल्या सगळ्यांचे आवडते देवता आहेत. पण खरोखर अश्या गजमानवाला बघून आपण कशी प्रतिक्रिया देऊ हा प्रश्नच आहे. हे बाळ दिसायला खूप गोड गोंडस दिसत आहे. ह्या बाळाला हत्ती सारखी सोंड ही आहे पण ह्याच्या भुजा मात्र विकृत आहेत. हातापायांना बोटं नाहीत. हे बाळ पुर्णपणे परावलंबी आहे आणि भविष्यात ही राहणार असं दिसते. आपलं लेकरू आपल्या म्हातारपणी आपला सहारा बनेल अशी प्रत्येक आई-बापाची इच्छा असते पण हे बाळ तर आयुष्यभर त्याच्या आईबापा वरच अवलंबून राहणार आहे. तेव्हा अश्या बाळाला जन्म देणार्या आई-बापाने खुश व्हावं किंवा दुखी हे आपणच सांगा?

-भूषण जोशी

दिनांक -२१/०१/२०१५

 

हिन्दी कविता- सीधा साधा गँवार हूँ..

 सीधा साधा गँवार हूँ..

 

 न मैं बंदूक हूँ ना ही तलवार हूँ..
संस्कृति-सभ्यता से जुड़ा.. सीधा साधा गँवार हूँ..

 

आदर बड़ों का करता श्रद्धा से हर बार हूँ..
छोटों का भी मैं करता दिल से दुलार हूँ..

 

न फॅशन की चाह कोई..न डिस्को का बुखार है..
मेरे लिये तो सादगी ही..मेरा साज-शृंगार है..

 

भारत मे रहता हूँ मैं..भारत से ही मुझे प्यार है..
सुना है आजकल मेरी उमर के..नौजवानों पर INDIA सवार है..

 

नफ़रत नहीं है मुझे पश्चिम से..ना ही पाश्चात्य से कोई बैर है..
किंतु संस्कृति को अपनी बचाना चाहता हूँ..
क्योंकि इसी में अगली पीढी की खैर है..

 

न भूला मैं संस्कारों को..न त्यागा शुद्ध विचारों को..
ना ही छोड़ा मानव धर्म को अपने..न अपनाया दुराचारों को..

 

एकनिष्ठ एकाग्र स्वयं से, प्राणों पर अपने उदार हूँ..
देशधर्मरक्षा हेतु सदा मर-मिटने को तैयार हूँ..

 

न मैं बंदूक हूँ ना ही तलवार हूँ..
संस्कृति-सभ्यता से जुड़ा.. सीधा साधा गँवार हूँ..

                                                                                                 -भूषण जोशी

"गृहीत धरू नका.."

"गृहीत धरू नका.."

 

राहील सदा तुमचाच तो..
ऐसे समझ कधी करू नका..
दुखवूनी हृदय प्रेम त्याचे..
जीवंतपणीच मारू नका..

 

नसेल जमलं हित कधी..
तरी अहित कुणाचं करू नका..
प्रेम तुम्हावर करतो जो..
गृहीत कधी त्यास धरू नका...

                                                                 -भूषण जोशी

"अहं सोडा.. प्रेम करा.. प्रेमास जपा.. " 

"अहं सोडा.. प्रेम करा.. प्रेमास जपा.. " 

प्रेम करणं सोपं असतं..
प्रेम होणं सोपं असतं..
प्रेम देणं सोपं असतं..
प्रेम घेणं सोपं असतं..
पण कठीण असतं ते प्रेम भेटणं..
त्यास सांभाळणं.. त्यास जपणं..
त्यास टिकवून ठेवणं..
एकच वारा पुरेसा असतो.. मोठेपणाचा..
अहंकाराचा..
अविश्वासाचा..
त्यास उडवून उध्वस्त करण्या साठी..
मग रहातात तुम्ही..
तुमचा मोठेपणा..
आणि तुमचा अहं..
आणि तुमचा अविश्वास..
आणि....
आयुष्यभराचा पश्चाताप..

                                                         -भूषण जोशी

माझी "मधुशाला" (हिन्दी कविता)

कुछ दिनों पहले श्री अमिताभ बच्चन जी के मुख से उन्हीं के पिताजी श्री हरिवंशराय बच्चन जी की प्रसिद्ध कविता "मधुशाला" की पंक्तियाँ सुनी.. अद्भुत एवम् गहन अर्थ से परिपूर्ण.. सुनते ही मेरे अंदर बैठा कवि भी मानो अपने आप ही बोल उठा कि.. 

अमिताभ जी ..

न कभी गया मैं मदिरालय में..
न कभी छुआ मद का प्याला..
किन्तु नशे में हूँ मैं महोदय..
सुन रहा हूँ जो मधुशाला..

 

नशा चढ़ा कैसा ये अद्भुत..
बेहॅक गया मैं भोलाभाला..
हर पंक्ति सुन मधुशाला की..
लगे पी गया मदिराला..

 

सुना मनाती होली प्रतिदिन..
रात दिवाली मधुशाला..
मधुशाला सुनकर के महोदय..
मान गया मैं मतवाला..

 

लगे रातभर पीता रहूँ मैं..
मधुशाला का प्रति प्याला..
नशा भला ये मुझको लगता..
मन-जागृत करने वाला..

 

रस ऐसा है मधुशाला का..
ना भटके कभी पीने वाला..
साक़ी छोड़ मदिरालय को..
मद से मधुर है मधुशाला..

 

मदिरा जीवन ब़दतर करती..
विष का जैसे हर प्याला..
संदेश जीवन का घोल पिलाती..
राह दिखाती मधुशाला..

                                                     -भूषण जोशी                                                       (दिनांक -१९/१/२०१५)

Saturday 17 January 2015

आलो जवळ तरी का आपण..

"आलो जवळ तरी का आपण.."

 

आलो जवळ तरी का आपण..
न भेटुनी कधी जरी..
सदा गुंतलो आणि हरपलो..
पार खोल मनी अंतरी.. 

 

नकळत आयुष्यात अलीस तू..
नकळत माझी झालीस तू..
न कधी मज भेटलीस तू..
न कधी मज दिसलीस तू...

 

न कधी तुज पाहिले ग मी..
न कधी तुज स्पर्षिले ग मी..
सदा तुज ऐकिले ग मी..
सदा तुज बोलले ग मी..

 

सदा तुज लिहिले ग मी..
सदा तुज वाचिले ग मी..
कल्पनेत तुज आणले ग मी..
स्वप्नात तुज कल्पिले ग मी..

 

खरी असली तरी कल्पनाच तू..
माझ्यातली प्रेम भावनाच तू..
न जीवनभराची साथ आपुली..
न पति-पत्नीची जात आपुली.. 

 

आवड तरी ही तुच माझी..
निवड तरी ही तुच माझी..
न भेटलीस मज जरी तू..
तरी राहशील तुच माझी..

                                                        -भूषण जोशी

Monday 5 January 2015

लेख- एक विचार.. राष्ट्रमाता कोण?

एक विचार.. राष्ट्रमाता कोण?

 

मित्रांनो महात्मा गांधींना "राष्ट्रपिता" म्हणून संबोधलं जाते. अश्या वेळेला बहोतेकांना प्रश्न पडतो की जर महात्मा गांधी हे "राष्ट्रपिता" आहेत तर मग "राष्ट्रमाता" कुणाला म्हणावं? बरेच लोक आपापल्या विचारानुसार कुणाला न कुणाला राष्ट्रमाता मानत असतात किंवा आहेत. पण मला असं वाटतं कि जर देशासाठी झुंझणार्‌याला ही पदवी मिळू शकते तर मग आपल्या बाळाला देश-रक्षणा साठी सीमेवर पाठवणार्या त्या "आई" ला "राष्ट्रमाता" का म्हणू नये? राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि असे कित्येक उदाहरणं आपल्याला इतिहासात पहायला वाचायला मिळतात. ह्या विरांगना स्वतःच्या बाळा सहित युद्धात उतरल्या होत्या. त्या काळातल्या राष्ट्रमाताच म्हणावं त्यांना.. असेच आजच्या काळातल्या "राष्ट्रमाता" ह्या त्या वीर सैनिकांच्या जननीच आहेत जे सैनिक सीमेवर शत्रूंशी लढता-लढता आपले प्राण सुद्धा गमावतात. प्रत्येक स्त्री साठी तिचं लेकरू हेच तिचे प्राण असते. पण ह्या वीर माता त्यांच्या पोटाचा गोळा हसत-हसत देशावर ओवाळून टकतात. माणूस एक वेळ स्वतःला मरणात लोटू शकतो पण आपल्या बाळाला नाही. ह्यावरूनच ह्या वीर मात्यांचे त्याग किती महान आहे ह्याची प्रचेति आपल्याला येते. अश्या महत्त्यागिनींना "राष्ट्रमाता" म्हणून संबोधणे सर्वथा योग्य आहे असे माला वाटते. सीमेवर लढणार्या प्रत्येक सैनिकाची आई ही त्या देशाच्या देशवासियां साठी राष्ट्रमाताच आहे, कारण तिचं लेकरू त्यांच्या रक्षणा साठी सीमेवर उभं असते म्हणून ते देशात सुखानी नांदू शकता. तेव्हा माझ्या मते तरी देशासाठी लढणारा प्रत्येक जण हा राष्ट्रपिता आणि देशावर हसत-हसत आपलं लेकरू ओवाळून टाकणारी प्रत्येक आई ही राष्ट्रमाताच आहे.

-भूषण जोशी

दिनांक : ०५-०१-२०१५

"जाता जाता ऐसे जावे.."

"जाता जाता ऐसे जावे.."

 

बोलता बोलता ऐसे बोलावे..
ऐकूनी जीवन मधुर बनावे..

गाता गाता ऐसे गावे..
श्वासाचे ही गीत व्हावे..

लढता लढता ऐसे लढावे..
शत्रूने ही भक्त बनावे..

देता देता ऐसे द्यावे..
घेणार्‌याचे ओंजळ फाटावे..

भजता भजता ऐसे भजावे..
देवाने साक्षात् अवतरावे..

हसता हसता ऐसे हसावे..
दुःखाने ही बघत रहावे..

बनता बनता ऐसे बनावे..
अवघ्या देशाने गर्व करावे..

जगता जगता ऐसे जगावे..
मरणाने ही नेतांना रडावे..

जाता जाता ऐसे जावे..
अवघ्या जगाने मुजरा घालावे..

                                                                         -भूषण जोशी

लेख - "काय भूषण!! नवीन वर्ष कसा साजरा केलास?

 

काही परिचित विचारत आहेत मला- "काय भूषण!! नवीन वर्ष कसा साजरा केलास? पार्टी कशी झाली?"
त्यांचे प्रश्न योग्य आहेत पण आता त्यांना कसे सांगावे कि आमच्या करता नवीन वर्ष म्हणजे फक्त भिंतीवरचं जुनं Calender काढायचं आणि नवीन लावायचं. मद्यपान आम्ही करत नाही, मांसाहार चालत नाही, DJ ची किंवा डिस्को ची हाउस नाही, आई-वडिलांचा आशिर्वाद घेतला आणि नवीन वर्षात प्रवेश केला. आई ने शेवया ची खीर केली होती त्यानेच तोंड गोड करून २०१४ ला bye-bye केलं. देवाला प्रार्थना केली कि बाबा हे नवीन वर्ष आम्हा सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि शांततेत जावो असा आशिर्वाद दे. पण समाधान एवढच आहे कि ह्या नवीन वर्षात मी सहकुटुंब सुखरूप प्रवेश केला. आणि मला वाटते कि ह्या पेक्षा जास्त महत्वाचा असं दुसरं काहीच नसते. उगाच धिंगाणा घालण्यात काय अर्थं आहे. 

 

-भूषण जोशी 

(दिनांक  ०१-०१-२०१५)

"नूतन-वर्षाभिनंदन.."

"नूतन-वर्षाभिनंदन.."

 

हसत हसत हे वर्ष जावे..
नाचत-कुदत नव-वर्ष यावे..
सहकुटुंब नवीन वर्षाच्या..
स्वागतास सगळ्यांनी यावे..

 

नूतन वर्षी नव्या जोमाने..
नवे कार्य सिद्धीस आणावे..
विश्व-शांती स्थापित व्हावी
देवास ऐसे प्रार्थ करावे.. 

 

शुभाषिश शुभ वर्ष नवे हे..
आनंदी सगळ्यांना जावे..
अपूर्ण जया इच्छा असल्या..
ह्या वर्षी पूर्णत्वास आणावे..

 

माथ्यावर लावुनी यश-चंदन..
गत वर्षाला करुनी वंदन..
भूषण सहृदय सगळ्यांना..
करितो नूतन-वर्षाभिनंदन..

                                                                       -भूषण जोशी