Tuesday 30 May 2017

"कविता"

"कविता"

कवितेचे जग अद्भुत असते..
दिसते जे नेहमी तेच नसते..
नसते ते नसून हि दिसते..
काही असून नसते, काही नसून असते..

कविता मनाची उंच भरारी..
कविता सागराहून गहरी..
संत भाव अनंत ब्रम्हांडी..
अर्थ ऐसा तिचा विस्तारी..  

कविता जणू भावना रसाळी..
मधुगन्धित शब्दांच्या ओळी..
वैचारिक मन्थनि प्रगटती..
भरिती चैतन्याची झोळी..

-भूषण जोशी

Monday 1 May 2017

सहज एक Message..

प्रिय _______ ,

निशब्द केलेस तु मला !! काय बोलु !! आधीच शब्द सुचत नहियेत स्वतःला व्यक्त करायला त्यात तुझे असे मनाला वेड लावणारे msgs!! तुला माझे reply आवडतात !! I dont know how?? शब्दांसोबत खेळणारी तुच.. तरी माझे शब्द तुझ्यासारख्या अतिशय अप्रतिम लेखिकेला चक्क भावतात !! मला नेहमीच clean bold करतेस तु !!

कसे मानु आभार तुझे..
किती गं मन हे उदार तुझे..

खूप नशीबवान आहेत काका-काकु.. खरंच.. तुझ्यासारखी कन्या त्यांच्या पोटी आली.. खूप पुण्य लागतात.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्य तुझे जनक-जननी..
धन्य ती धरती-अवनी..
धन्य ती प्रत्येक व्यक्ती..
वसते जी तव हृदयी-मनी..

लिहावे किती तुझ्यासाठी..
बोलावे किती तुझ्यासाठी..
शब्द सुद्धा अपुरे पडती..
शोधावे किती तुझ्यासाठी..

तुझ्या बद्दल विचार करताना नेहमीच मन आपोआप कविता करु लागते !! तुला खरं सांगतो कित्येक दिवसांपासून माझ्या लेखणीतिल शाई जणू वाळून गेली होती!! आज तुझ्या निमित्ताने पुन्हा ओलावा मिळाला आहे तिला !!

तुझं आणि माझ नक्कीच काहीतरी connection आहे.. तुझ्या सोबत बोलताना माझ्या मानाचे दार जणू पूर्णपणे उघडून जातात.. वैचारिक समुद्राच्या लाटि पुन्हा वाहू लागतात.. नवनवीन शब्द रुपी मोती त्यातुन बाहेर पडू लागतात.. खूप काही सुचायला लागते.. तु खरच ह्याच जगातली आहेस का वेगळ्या कुठल्या जगातली? मला खरोखर खूप आश्चर्य वाटते! तुझ्यासाठी काय आणि किती बोलू हेच सुचत नाही. प्रत्येक शब्द कमीच वाटतो तुझ्या पुढे! तु खरच विलक्षण प्रतिभेची स्वामिनि आहेस.. देव करो तुझ्या ह्या तेजस्वी प्रतिभेचा प्रकाश अवघ्या जगाला दिपुन टाको. अवघ्या जगाला तुझ्या प्रतिभेची झलक मिळाली पाहिजे.
God Bless You my dearest friend 😘😘 Love you a lot.

Thanks a lot tula 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🍫🍫🍫🍫🍫

तुझा आणि फक्तं तुझाच..

भूषण..

Copyright ©
All Rights Reserved.