Wednesday 24 December 2014

बहुदा हीच दुनियादारी..

बहुदा हीच दुनियादारी..

 

मित्र इथ वर येई ना..
मैत्रीण उत्तर देई ना..
बेरोजगार मी काय झालो..
कुणालाच ओळखू येई ना..  


विश्वास स्वतः वर पक्का..
आहे सदैव लढनाया..
साथ तरी लागते गड्यांनो..
गड टिकून ठेवाया..

 

आलो नाही मी दारी..
तुमच्या पैसा मागाया..
बस दोन शब्द प्रेमाचे..
आलो होतो ऐकाया..

 

असलो गरीब तरीही..
श्रीमंत हृदय प्रेमानि..
तोडिले तुम्हीच तयाला..
तुमच्या मतलबीपण्यानि..

 

रहा खुशाल तुम्ही पण..
तुमच्या नोटांच्या महाली..
मी माझी बेकारी..
सोडा मजला मज हाली..

 

साथ सोडली सगळ्यांनी..
दाट ह्या अंधारी..
शाप जणू जाहली..
माझी ही बेरोजगारी..

 

रुसले सगळेच माझ्यावर..
बंद केली दारी..
सक्खे काय परके काय..
बहुदा हीच दुनियादारी..

 

                                                        -भूषण जोशी

Saturday 20 December 2014

"लज्जा खरच आभूषण स्त्रीचं.."

"लज्जा खरच आभूषण स्त्रीचं.."

 

सखी तू माझी किती लाजरी..
गोड गोजिरी छान..
भेट आपुली पहिली-वहिली..
मनी उमंग तुफ़ान..

 

मज बघुनि तू लाजू लाजू..
का होतेस हैराण..
नज़र लपविते मला लाजुनी
खाली घालुनी मान..

 

लाजर्या त्या गोड मुखावर..
हसू दिसे किती छान..
गाला वरची खळी पाहता..
विसरून जाई भान..

 

स्त्री लज्जा अनमोल किती..
मानिले करुनी सम्मान..
लज्जा खरच आभूषण स्त्रीचं..
झाली मज ही जाण.. 

 

लज्जा खरच आभूषण स्त्रीचं..
झाली मज ही जाण.. 

 

                                                  -भूषण जोशी

"एक संध्या नदी काठी.."

"एक संध्या नदी काठी.."

एक संध्या नदी काठी..
खडका वरी बैसलो ऐठी..
निसर्ग राजाच जणू झालो..
आदेशू लागलो प्रत्येक लाटी..

 

लाटी कधी कुणास बदल्या..
मला ही मुकून बेधडक सुटल्या..
पश्चिमेस मावळत्या सूर्याला..
जणू जाऊनी बेभान भेटल्या..

 

मी पण मग हात उचलला..
लाटींना "जा पळा" उच्चरला ..
जया दिशेने वाहत लाटी..
तया दिशेला हात दर्शवला..

 

सुंदर अशी ती संध्या होती..
सूर्याची लालिमा पसरली..
हवा मंद ती वाहता वाहता..
मला स्पर्शुनी दिशाच विसरली..

 

मला म्हणाली जाउ कोठे..
तुला बघुनी मन का ओसरले..
पूर्वेस बहुदा वाहत होते..
पण पूर्व कोठे हेच विसरले..

 

ऐकूनी तिला मी हसत म्हणालो..
चेष्टा छान करतेस हवे तू..
जया दिशेला मज हस्त आहे..
तया विरुद्ध वाहत जावे तू..

 

निसर्गात बसुनी काही क्षण..
कृत्रिम जगाला मी ही विसरलो..
शुद्ध हवेत वेळ घालवता..
नदी काठीच छान रमलो..

 

लाट म्हणाली राजे आता..
घरी कधी जायाचे तुम्हा..
किती वेळ खडकावर बसुनी..
बघत राहणार ऐसेची आम्हा..

 

घर माझे कुठे पळत नाही..
लाटेला मी ऐठीत उत्तरलो..
थोडे क्षण का होवे ना..
राजा मी आज येथे अवतरलो..

 

ऐसेच गप्पा करता करता..
अंधार मग पडू लागला..
निरोप घेतो निसर्ग माई..
हृदय माझा म्हणू लागला..

 

माई म्हणाली का रे राजा..
एकटाच आला होतास का..
संगिनी वा मित्र कोणी..
सोबतीला नवतास का..

 

माई तुझ्या कुशीत मी..
एकटाच रमाया आलो ग..
मित्र मैत्रिणी आहेत तरी..
तुझ भेटाया आलो ग..

 

ऐसी ती अविस्मरणीय संध्या..
मज नदी काठी भेटली..
तुच्छ माझ्या ह्या देहाला ती..
निसर्ग राजा बनवूनी गेली..

 

                                                         -भूषण जोशी

Tuesday 16 December 2014

"मानवता हाच धर्म खरा.."

"मानवता हाच धर्म खरा.."

 

अदृष्य भिंती तू का बांधतो रे..
अनायास मनुजा तू का भांडतो रे..

 

धर्म-जाति-रंग तू का मानतो रे..
परकीयां सारखा तू का नांदतो रे..

 

एक माय तुमची ती धरती बिचारी..
तिचे दुःख मर्म कधी जाणतो रे..

 

जळते धरा ती आतून दडपून..
तिच्या लेकराचे तू रक्त सांडतो रे..

 

अनाचार सगळा हा थांबव रे आता..
अहंकार खोटा हा पेटव रे आता..

 

नको भेद कसलाच पाळू मनी तू..
विचार समते चा तू पसरव रे आता..

 

किती ही जुने ते संस्कार असले..
त्यागून सगळ्यांनी एकत्र यावे..

 

स्व-बांधवांना विभाजित करी जे...
संस्कार त्यांना बरे का म्हणावे..

 

अज्ञानतेचा हा काळोख सगळा..
पुसाया सुरु हे आत्ताच करावे..

 

किती ही जरी धर्म असले जगी ह्या..
'खरा धर्म' हे मानवतेलाच म्हणावे..

 

                                                                  -भूषण जोशी

Saturday 13 December 2014

तुच खरी श्रीमंत..

 

तुच खरी श्रीमंत..

 

चित्र तुझे बघतांना मजला भान माझे राहे ना..
डोळे बंद जरी केले तरी छवी तुझी जाये ना..
पाणीदार ते डोळे तुझे स्मित हास्य किती गोजिरे..
दिवा लावते दारी होते दिवाळ सण साजरे..

 

प्रखर प्रकाश तुझ्या चेहेर्याचा पडतो घर अंगणी..
दिवा हळूच मुजरा देतो तुजला मग वाकूनी..
सुंदर केस तुझ्या रुपाला आणखी सुंदर करता..
एखाद्याचे जीवन सहज जाईल तुलाच बघता..

 

रूप चमकते तुझे एवढे दिवा कशाला हवा..
तेज तुझ्या रुपाचा ऐसा जणू सूर्य तो नवा..
मनात भरते क्षणात बघता गोड तुझी ती छवी..
सुंदर सरळ निरागस ऐसी सखी सदा मज हवी...

 

स्तुति तुझी करता मजला आनंद सदा मिळतो ग..
तुझी प्रशंसा करता-करता जणू हृदय हसतो ग..
शब्द जरी मज कमी ते पडले भाव सदैव अनंत..
सुंदर तन-मन तुझे सखे ग तुच खरी श्रीमंत..

 

सखे ग तुच खरी श्रीमंत..

                                                                          - भूषण जोशी

"महिमा थेंबाची"


"महिमा थेंबाची"

 

थेंब जरी तो पाण्याचा..
धडा शिकवितो मोलाचा..
सत्संगती चं ज्ञान देतो..
शिक्वण बघा किती छान देतो..

 

चिखली पडता संपून जातो..
हाती पडता हीरा दिसतो..
शिंपली पड़ता मोती होतो..
संगत तैसे रूप घेतो..

 

मानव ही थेंबा वाणीच असतो..
जया मिसळला तयाच रंगतो..

 

रंग म्हणजे संग येथे..
संग सदा सत्संग येथे..
सत्संगती उद्धार करते..
कुसंगती विकार ठरते..

 

तेव्हा थेंबाचे ध्यान असावे..
संगत करता भान ठेवावे..
सज्जन सभ्य सदा निवडावे..
थेंबा वानी मोती बनावे..

 

थेंबा वानी मोती बनावे..

 

                                                           -भूषण जोशी

Wednesday 10 December 2014

धीर हो..

धीर हो..

धीर हो खंबीर हो.. तू दुष्ट मर्दन वीर हो..
सद्रक्षणाय खल्निग्रहणाय.. भो रक्षका ! गंभीर हो..  

तू धार हो तू वार हो.. सत्याची तू तलवार हो..
आधार हो अवतार हो.. न्यायाचा तू हथ्यार हो..

हा रक्त-रंजित अग्निपथ.. तरी अविचल तू विचार हो.. 
तुज पाहुनी तुज जाणुनी.. भयभीत शत्रू अपार हो..
    
साधे सरळ निर्दोष जन.. तुझ कारणी उद्धार हो..  
देइ-कष्ट-भ्रष्ट-अतिदुष्ट जे.. असुरांचा त्या संहार हो.. 

आकार हो साकार हो.. नव-संस्कृती संस्कार हो.. 
कर नष्ट भ्रष्ट हि यंत्रणा.. नव-रक्ष शिष्टाचार हो.. 

आई भगिनी समान ती.. नारी समाजी वावरे.. 
पडे संकटी जेव्हा कधी.. तिस राखण्या तू धाव रे..

बन दक्ष कर हे लक्ष्य आता नारी चिंता मुक्त हो.. 
कामी व्यसनि वा असो अधमी व्यभिचारी सगळे लुप्त हो.. 

बन शिस्त तंत्र स्वतंत्र तू.. दे जन-अभय अभिमंत्र तू.. 
अपराध-रहित समाज हो.. बन शांति-स्थापक यंत्र तू.. 
 
तू आन हो तू शान हो.. देशाचा तू अभिमान हो.. 
कल्याण हो तुझे मान हो.. ऐसे समाज उत्थान हो..
 
बन धनुष तू बन बाण तू.. कर शुद्ध मन निज-प्राण तू ..
हो श्रेष्ठ तू परम ईष्ठ तू.. पण राहा कर्तव्य-निष्ठ तू ..
हो श्रेष्ठ तू परम ईष्ठ तू.. पण राहा कर्तव्य-निष्ठ तू ..
                                                                                           -भूषण जोशी


  

 


 


  




Wednesday 3 December 2014

"द्या स्त्रीस सम्मान.. "

 

"द्या स्त्रीस सम्मान.. "

 

द्या स्त्रीस सम्मान.. गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..
कशी वेळ ही अप्रिय आली..
कशी विस्मृती तुम्हास झाली..
जगता कैसे तथ्य विसरुनी हे..
तुम्ही तिचीच संतान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

तिच्या विना मज जग कल्पे ना..
तिच्या विना संसार दिसे ना..
तिच्या विना काहीच जन्मे ना..
करते जगत गतीमान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

वंश वाढते तिच्या कृपेने..
बाळ जन्मते तिच्या कृपेने..
भविष्य घडते तिच्या कृपेने..
ऐसी ती शक्ती महान्..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

वेळ भासता शस्त्र ही धरले..
शत्रू चे आव्हान स्वीकरले..
युद्धात ही ती लढली ऐसी..
शत्रू दाणाफान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

पत्नी कधी ती असते गृहिणी..
आई कधी ती असते भगिनी..
संकटा क्षणी असुरमर्दिनी..
जणू दैवी वरदान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

मायेला तिच्या कधी अंत नसे..
भक्ती ऐसी भगवंत जसे..
उदार छवी जणू संत दिसे..
तीच इथे भगवान्.. 

गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान.. गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

                                                                                                   -भूषण जोशी