Wednesday 3 December 2014

"द्या स्त्रीस सम्मान.. "

 

"द्या स्त्रीस सम्मान.. "

 

द्या स्त्रीस सम्मान.. गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..
कशी वेळ ही अप्रिय आली..
कशी विस्मृती तुम्हास झाली..
जगता कैसे तथ्य विसरुनी हे..
तुम्ही तिचीच संतान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

तिच्या विना मज जग कल्पे ना..
तिच्या विना संसार दिसे ना..
तिच्या विना काहीच जन्मे ना..
करते जगत गतीमान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

वंश वाढते तिच्या कृपेने..
बाळ जन्मते तिच्या कृपेने..
भविष्य घडते तिच्या कृपेने..
ऐसी ती शक्ती महान्..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

वेळ भासता शस्त्र ही धरले..
शत्रू चे आव्हान स्वीकरले..
युद्धात ही ती लढली ऐसी..
शत्रू दाणाफान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

पत्नी कधी ती असते गृहिणी..
आई कधी ती असते भगिनी..
संकटा क्षणी असुरमर्दिनी..
जणू दैवी वरदान..
गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

 

मायेला तिच्या कधी अंत नसे..
भक्ती ऐसी भगवंत जसे..
उदार छवी जणू संत दिसे..
तीच इथे भगवान्.. 

गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान.. गड्या हो.. द्या स्त्रीस सम्मान..

                                                                                                   -भूषण जोशी

2 comments:

  1. जर हे सर्वांनाच कळलं असत तर फारच बर झालं असत .... खूप सुंदर कविता आहे भूषण फार छान शब्दात तू ती मांडलीये

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you ani barobar mhanalis Snehal.. Saglyanna he kalava mhanunach lihileli me hi kavita..

      Delete