Saturday 20 December 2014

"एक संध्या नदी काठी.."

"एक संध्या नदी काठी.."

एक संध्या नदी काठी..
खडका वरी बैसलो ऐठी..
निसर्ग राजाच जणू झालो..
आदेशू लागलो प्रत्येक लाटी..

 

लाटी कधी कुणास बदल्या..
मला ही मुकून बेधडक सुटल्या..
पश्चिमेस मावळत्या सूर्याला..
जणू जाऊनी बेभान भेटल्या..

 

मी पण मग हात उचलला..
लाटींना "जा पळा" उच्चरला ..
जया दिशेने वाहत लाटी..
तया दिशेला हात दर्शवला..

 

सुंदर अशी ती संध्या होती..
सूर्याची लालिमा पसरली..
हवा मंद ती वाहता वाहता..
मला स्पर्शुनी दिशाच विसरली..

 

मला म्हणाली जाउ कोठे..
तुला बघुनी मन का ओसरले..
पूर्वेस बहुदा वाहत होते..
पण पूर्व कोठे हेच विसरले..

 

ऐकूनी तिला मी हसत म्हणालो..
चेष्टा छान करतेस हवे तू..
जया दिशेला मज हस्त आहे..
तया विरुद्ध वाहत जावे तू..

 

निसर्गात बसुनी काही क्षण..
कृत्रिम जगाला मी ही विसरलो..
शुद्ध हवेत वेळ घालवता..
नदी काठीच छान रमलो..

 

लाट म्हणाली राजे आता..
घरी कधी जायाचे तुम्हा..
किती वेळ खडकावर बसुनी..
बघत राहणार ऐसेची आम्हा..

 

घर माझे कुठे पळत नाही..
लाटेला मी ऐठीत उत्तरलो..
थोडे क्षण का होवे ना..
राजा मी आज येथे अवतरलो..

 

ऐसेच गप्पा करता करता..
अंधार मग पडू लागला..
निरोप घेतो निसर्ग माई..
हृदय माझा म्हणू लागला..

 

माई म्हणाली का रे राजा..
एकटाच आला होतास का..
संगिनी वा मित्र कोणी..
सोबतीला नवतास का..

 

माई तुझ्या कुशीत मी..
एकटाच रमाया आलो ग..
मित्र मैत्रिणी आहेत तरी..
तुझ भेटाया आलो ग..

 

ऐसी ती अविस्मरणीय संध्या..
मज नदी काठी भेटली..
तुच्छ माझ्या ह्या देहाला ती..
निसर्ग राजा बनवूनी गेली..

 

                                                         -भूषण जोशी

No comments:

Post a Comment