Wednesday 24 December 2014

बहुदा हीच दुनियादारी..

बहुदा हीच दुनियादारी..

 

मित्र इथ वर येई ना..
मैत्रीण उत्तर देई ना..
बेरोजगार मी काय झालो..
कुणालाच ओळखू येई ना..  


विश्वास स्वतः वर पक्का..
आहे सदैव लढनाया..
साथ तरी लागते गड्यांनो..
गड टिकून ठेवाया..

 

आलो नाही मी दारी..
तुमच्या पैसा मागाया..
बस दोन शब्द प्रेमाचे..
आलो होतो ऐकाया..

 

असलो गरीब तरीही..
श्रीमंत हृदय प्रेमानि..
तोडिले तुम्हीच तयाला..
तुमच्या मतलबीपण्यानि..

 

रहा खुशाल तुम्ही पण..
तुमच्या नोटांच्या महाली..
मी माझी बेकारी..
सोडा मजला मज हाली..

 

साथ सोडली सगळ्यांनी..
दाट ह्या अंधारी..
शाप जणू जाहली..
माझी ही बेरोजगारी..

 

रुसले सगळेच माझ्यावर..
बंद केली दारी..
सक्खे काय परके काय..
बहुदा हीच दुनियादारी..

 

                                                        -भूषण जोशी

No comments:

Post a Comment