Saturday 13 December 2014

तुच खरी श्रीमंत..

 

तुच खरी श्रीमंत..

 

चित्र तुझे बघतांना मजला भान माझे राहे ना..
डोळे बंद जरी केले तरी छवी तुझी जाये ना..
पाणीदार ते डोळे तुझे स्मित हास्य किती गोजिरे..
दिवा लावते दारी होते दिवाळ सण साजरे..

 

प्रखर प्रकाश तुझ्या चेहेर्याचा पडतो घर अंगणी..
दिवा हळूच मुजरा देतो तुजला मग वाकूनी..
सुंदर केस तुझ्या रुपाला आणखी सुंदर करता..
एखाद्याचे जीवन सहज जाईल तुलाच बघता..

 

रूप चमकते तुझे एवढे दिवा कशाला हवा..
तेज तुझ्या रुपाचा ऐसा जणू सूर्य तो नवा..
मनात भरते क्षणात बघता गोड तुझी ती छवी..
सुंदर सरळ निरागस ऐसी सखी सदा मज हवी...

 

स्तुति तुझी करता मजला आनंद सदा मिळतो ग..
तुझी प्रशंसा करता-करता जणू हृदय हसतो ग..
शब्द जरी मज कमी ते पडले भाव सदैव अनंत..
सुंदर तन-मन तुझे सखे ग तुच खरी श्रीमंत..

 

सखे ग तुच खरी श्रीमंत..

                                                                          - भूषण जोशी

No comments:

Post a Comment