Sunday 30 November 2014

"साली आधी घरवाली" वाह वाह.. हा हा हा.. "दिर अर्धे पती परमेश्वर"????? काय? काय बोलतेस? लाज नाही वाटत?

"साली आधी घरवाली" वाह वाह.. हा हा हा.. "दिर अर्धे पती परमेश्वर"????? काय? काय बोलतेस? लाज नाही वाटत?

शीर्षक वाचून आपणा सर्वांस कळाले असेनच कि मुद्दा काय आहे. दुहेरी व्यक्तिमत्वाचा आपला हा समाज एकी कडे नवरात्रोत्सवी ९ देव्यांची पूजा सेवा करित असतो पण जी देवी मनुष्य रुपात ह्या समाजात वावरते तिचं मात्र मानसिक खच्चीकरण केलं जाते. तिला अक्षरशः वस्तू असल्या सारखे वागवले जाते. तिच्या मनाचा आणि भावनांचा अजिबात विचार केला जात नाही. असाच एक मुद्दा म्हणजे लग्न झाल्या नंतर किंवा लग्नात पुरुष मंडळी आपल्या मित्रां समोर आपल्या बायकोच्या बहिणीला "साली आधी घरवाली" असे संबोधतात आणि मित्र सुद्धा ह्या फालतू व्यंगाचा फार कौतुकाने ही ही हा हा करत आनंद घेतात. अश्या वेळेस बायकोच्या मनाला कसे वाटअसेन ह्याचा विचार केला जात नाही. मुद्दा जरी चेष्टा करण्या इतपत लहान असला तरीही अशी चेष्टा बायकोने तिच्या दिरा बद्दल केलेली सहन केली जात नाही. तिला उलट प्रश्न विचारले जातात. तिच्या कडे शंकेच्या दृष्टीने बघितले जाते. पार तिच्या चारित्र्या वरच आक्षेप घेतला जातो. असे भेदभाव का? मर्यादा काय फक्त बायकान साठीच असते का? "साली अर्धी घरवाली" असे विधान करतांना बायकोच्या मनाचा जर का विचार होत नसेल तर नवर्याचा भाऊ म्हणजे "दिर अर्धे पती परमेश्वर" असे विधान बायकोनि केल्यास काही ही चुकीचे नाही.. संस्कृती ही दोघांची मग त्यातले बंधनं हे फक्त बायकोलाच का? संस्कार दोघांवर बरोबर होतात.. मग पुरुषांनी समाजात कसे ही वागले तरी ते बरोबर आणि बायकांनि मात्र घराचा उंबरठा जरी ओलांडला तरी ही कहर होतो.. ज्या समाजात देवताच नव्हे तर देवींचि सुद्धा पूजा होते त्या समाजात घरातल्य स्त्रीला मात्र वस्तू प्रमाणे वागवले जाते.. माझ्या नजरे हे पुर्णपणे अनुचित आहे. आज स्त्री-पुरुष समानता ऐसे तत्वज्ञान आपण ऐकत असतो पण ह्यावर अमल किती वेळा करतो ह्याचा विचार केला आहे का कुणी?

Saturday 29 November 2014

"शुभ प्रभात.."

"शुभ प्रभात.." 

 

दिवस उगविला झाली पहाट..
अंगी भरते थंडीची लाट..
गोड उन्हाची बघता वाट..
सूर्य उगवला सुंदर विराट..

 

धुंद हिवाळी आहे उन्हात..
स्पर्शुनी जणू पडलो मी सुखात..
कोकिळेच्या त्या मधुर स्वरात..
जणू पाखरे ही होती गात..

 

सडा घालीते आई अंगणात..
दृश्य सुंदर रमलो पहात..
नकळत शब्द येई मुखात..
निसर्ग जणू वसला हृदयात..

 

उठा मित्रहो संपली की रात..
उठा नव्याने करा सुरुवात..
देवापाशी जोडुनी हात..
करा खरे जे दिसे स्वप्नात..

 

राहो आनंदी तुम्ही जगात..
प्रेम तुमच्या असो मनात..
दिवस तुमचा जावो हर्षात..
तुम्हा सगळ्यांना शुभ प्रभात..
तुम्हा सगळ्यांना शुभ प्रभात..

                                                                    -भूषण जोशी

Friday 28 November 2014

"गुंतू नये माणसात.."

"गुंतू नये माणसात.."

 

गुंतू नये माणसात,

जीव लावावे देवात,

माणूस सदा रहात नाही,

देव सोडुनी जात नाही,

किती ही पूजिले माणसा तरी,

देव त्याचा होत नाही,

का म्हणूनी सहन करावी,

विरहाची यातना ही?

तोडुनी जातो हृदय जो,

मोल त्यास रहात नाही,

स्त्री असो वा तो पुरुष,

माणुसकी ही त्यात नाही,

प्रेम करुनी देवास बघावे,

गुंतुनी त्याच्यात पहावे,

आनंद अफाट सागर तो,

मनसोक्त जया पोहत जावे,

प्रेम हे अनमोल ज्याला,

देवात लावुनी सार्थ करावे,

देव म्हणजे कोण आता?

तोच रे जो जन्मदाता!!

दोन रुपात नांदी जगी जो,

पिता तुझा नि तुझीच माता..

पिता तुझा नि तुझीच माता..

                                                            -भूषण जोशी

"आभार तुझे.."

"आभार तुझे.."


कैसे मानू आभार तुझे,

किती ग मन हे उदार तुझे,

जैसे सुंदर नाम तुझे,

तैसेच सार्थक काम तुझे,

गोड छवी तुझी हसत-मुखी तू,

शब्दांची ग छान सखी तू,

तुझ्याच प्रेरणी लिहितो मी पण,

कविता करतो नसूनी कवी पण,

अनोळखी तरी दिले प्रोत्साहन,

अंकुरास मिळते जणू जीवन,

रचना पहिली तुझ्याच साठी,

दुसरी ही करतो तुझ अर्पण,

कमीच वाटे लिहिल किती तरी,

एवढे मनी उपकार तुझे,

देवा चरणी हीच प्रार्थना,

होवो हित-स्वप्न साकार तुझे,

कैसे मानू आभार तुझे,

किती ग मन हे उदार तुझे..

                                                    -भूषण जोशी

"तुझ्याच साठी"

"तुझ्याच साठी"

 

कविता ही ग तुझ्याच साठी, 

नव-सरिता ही ग तुझ्याच साठी,

सखी नवी तूज अर्पण करितो.. 

रचना ही मज तुझ्याच साठी..


कधी नव्हे देखिले तुला मी,

सखी सदा ऐकिले तुला मी,

मधुर सखी आवाज तुझा,

साधा सुन्दर अंदाज तुझा, 

मैत्रीच्या ह्या रेशीम गाठी,

हृदयी ओविले तुझ्याच साठी..


दोघांना आवडे कला,

संगीत तुला, संगीत मला,

सप्तसुरांशी खेळतेस तू,

सप्तसुरांना जोडतेस तू,

गायनात मिळतो तुझला रस,

एवढीच मागणी तुला बस,

नाते तुझे हे तोडू नकोस,

संगीत कधी तू सोडू नको,

यश प्रसिद्धी लाभो तुजला,

आणखी नको काही मजला,

शब्दास जागुनी रचल्या मी,

ओळी सखी ह्या तुझ्याच साठी,


कविता ही ग तुझ्याच साठी..

नव-सरिता ही ग तुझ्याच साठी..

  सखी नवी तूज अर्पण करितो.. 

                    रचना ही मज तुझ्याच साठी..                                                                                                           -भूषण जोशी

"मानुसकी चा जन्म.."

 

"मानुसकी चा जन्म.."

 

जाणे का जीवनी मानसा..
क्रोध ओढुनी घेतोस तू..
क्षणिक दुखाच्या वेदने पायी..
जन्माचे नाते तोडीतोस तू..

 

अहंकार पैसा समृद्धी..
शत्रू ऐसे पाळतोस तू..
आहारी जावूनी जयाच्या..
मानुसकी का जाळतोस तू..

 

अंत काळी सोडुनी सगळे..
जाशील यम नगरी तू..
सांभाळशील कैसे तुझ्या ह्या..
पापाने छळकत्या घागरी तू..

 

असत एवढ ज्ञान मानसा..
का मानुस तो म्हणावा..
उदारता जर अनंत असती..
देवच त्याचा करावा...

 

राग लोभ सोडून जाणे..
मरताना सगळेच येथे..
जाण होते ज्यास ह्याची..
मानुसकी जनमते तेथे...

 

जाण होते ज्यास ह्याची..
मानुसकी जनमते तेथे..

                                                           -भूषन जोशी

"लेखणी"

माझी ही रचना सगळ्याच लेखकांना समर्पित आहे.. आपण सगळे खूप छान लिहिता.. असेच लिहित रहा.. धन्यवाद.. __/|\__

 

"लेखणी"

 

घे हाती कलम तू..
सागर ही बनेल शाई..
लिहिले जरी तू काही..
तुझ रोखणार नाही..

 

आहे सुंदर साजरी..
तुझी लेखणाई..
शब्द-पुष्प फुलते जणू..
मनी अंगणाई..

 

तेजस्वी लेखणी तुझी ही..
पसरवी रोशनाई..
अजाणतेच्या अंधकातून..
ज्ञानप्रकाशी नेई..

 

का हवे शस्त्र तुझला..
का हवी बळीष्ठायी..
कलम तुझी कुठल्याही..
शस्त्रा वाणीच धारदायी..

 

निंदकास करू दे निंदा..
शत्रू शी कर लढाई..
कर प्रहार शब्दांचे ऐसे..
भले भले चाटतील भूई..

 

कर लेखणी जग बदलाया..
कर जगणे फळदाई..
जग बदलुनी जग सुंदर बनले..
ह्यातच तुझी पुण्याई..

 

पर शब्दांचे लाव मनाला..
गाठ विचार उँचाई..
वैचारिक मंथन कर गुंजन..
सत्य सदा तू गाई..

 

हो प्रसिद्ध लेखणी तुझी..
वरदे तुझ शारदाई..
ठरो तुझी लेखणी माणसा..
बहु प्रेरणा-दाई..

 

ठरो तुझी लेखणी माणसा..
बहु प्रेरणा-दाई..

                                                      -भूषण जोशी

लेख- "Rock-star संत"

"Rock-star संत"

मित्रांनो सर्वप्रथम नमस्कार. पहिल्यांदाच एखाद्या मुद्दयावर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. चुकल्यास सांभाळुन घ्यावे. काल TV वर काही बातम्या बघितल्या आणि एक दृश्य पाहून मला हसूच आवरेना. पंजाब येथील एक संत अथवा बाबा अक्षरशः रॉकस्टार(Rock-star) सारखा सत्संग करतांना दाखविला. मोठे मोठे वूफर(Woofer), अफाट मोठे मैदान, भली मोठी गर्दी, डिस्को लाइट आणि काय काय तरी. सत्संग करताना संत भजन गातात पण इथे तर ह्या संताने सरळ रॉक-कॉन्सर्ट (Rock-Concert) सुरु केलेला. भजनाचे बोल असे होते- "यू आर माइ लव-चारजर" (You are my Love-Charger). त्याला बघून मला रणबीर कपूर चा 'Rock-star' हा सिनेमा आठवला. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अशी की तेथे सत्संगा साठी आलेले त्यांचे भक्त किंवा अनुयायी सुद्धा मोठ-मोठ्याने ओरडत गात नाचत होते. मित्रहो मी सुद्धा माझ्या आयुष्यात बरेच सत्संग ऐकिले आहेत, बरेच भजन ऐकिले आहेत, पण हा असा धांगड-धिंगा फक्त पाश्चात्य संगीता मधेच बघायला मिळतो. मला त्यांच्या त्या मॉडर्न भजनात तीळमात्र ही सातविकता आढळली नाही! मनःशांती साठी आपण भजन आणि सत्संग ऐकतो पण ह्यांच भजन ऐकून तर माझ मन पुर्ण पणे अशांत झाल. नवल वाटते अश्या बाबांच आणि त्याहून ही जास्त त्या भक्तांच जे अश्या बाबांच्या आहारी जातात. त्याच भागातला आणखी एक बाबा गजा आड गेला. तो तर सरळ सरळ 'मीच देव आहे' असे सांगत असे. इतर देवी-देवतांना मानू नका. माझीच पूजा करा ऐसे सांगत असे. काही बाबा तर त्यांच्या सत्संगा मधे बसण्या साठी पैसे(Fees) सुद्धा घेतात. असो.. ह्या बातम्या पाहून एक खात्री मात्र नक्की झाली की आजकालचे संत आणि बाबा पुढच्या पिढीला ध्यासून सत्संग करित आहेत. बहुदा त्यांना असे वाटत असावे की पुढची पिढी हे असेच रॉकिंग(Rocking) भजन आणि सत्संग पसंत करेन. आता "विट्ठला तुच माझा प्रेमस्रोत" असे शब्द ह्या नव्या पिढीला आवडणार नाहीत, "यू आर माइ लव चारजर" असेच पाश्चात्य बोल आवडतील. मित्रहो आपल्या संस्कृतीचे पाश्च्यातीकरण होऊ लागलेले आहे. तसेही नवीन पिढीला ह्या वास्तविकतेशी काहीच घेण-देण नाहीये हे मला माहित आहे पण असे भजन आणि असे स्वतहोच्चारित देवांचे सत्संग जर असेच चालत राहिले तर लवकरच आपल्या देशावर नवीन शासक शासन करतील. चांगले प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा ह्या बाबांच्या आहारी जात आहेत आणि आपली संपत्ती त्यांच्या वरून ओवाळून टाकत आहेत. आपण सर्वांनी वेळीच सावध व्हायला हवे. ह्या ढोंगी बाबांनी संत समजाला काळिमा फास्ली आहे. आपल्या येथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे थोर संत होऊन गेले आहेत. ह्यांची परंपरा आता असे ढोंगी बाबा चालवणार आहेत का? लोकांची दिशाभूल करून मनाला येईल ते त्यांच्या कडून साधून घेणे हे ह्या ढोंग्यांच कारस्थान. खरे निःस्वार्थ गुरु भेटणे हे आजच्या काळात जरी कठीण असले तरी ते अशक्य नाही. कुठल्या ही गुरु चा आदेश ऐकण्या आधी स्वताची विवेकबुद्धी वापरावी. अंध-विश्वासा पासून सावध रहावे. शेवटी आपले खरे गुरु आपणच होय. आपणच विचार करायला हवा की आपल्याला अश्या रॉकिंग संतांची गरज आहे का? एक गोष्ट लक्ष्यात असूद्या, आपल्या समस्या ह्या आपणच सोडावयाच्या असतात. कुठला ही गुरु चमत्कार दाखवून आपल्या समस्या सोडवू शकत नाही. सकारात्मक दृष्टीकोन असणे गरजेचे असते. तेव्हा जीवनात साकारत्मक रहा, आणि अश्या ढोंग्यांच्या आहारी जाउ नका. समस्येवर व्यवहारिक समाधान शोधा आणि आपले जीवन हे खरोखर rocking बनवा..
-भूषण जोशी.

Thursday 27 November 2014

"प्रेम"

"प्रेम"

प्रेम उमळत्या फुलात वसते..
प्रेम वाहत्या झर्यात दिसते..
प्रेम ते वर निसर्गाचे जे..
प्रत्येकास अनमोल असते..

प्रेम म्हणजे आईचं हृदय..
प्रेम म्हणजे पित्याचा आधार..
प्रेम म्हणजे बहिणीची माया..
प्रेम म्हणजे मित्र उदार...

प्रेम अपेक्षा रहित असावं..
प्रेम भावने सहित असावं..
प्रेम सदा निःस्वार्थ करावं.. 
प्रेम सदा परमार्थ बनावं..

प्रेमात सदा जगायचं असतं..
प्रेमात सदा बोलायचं असतं..
कितीही मनात वादळ सुटले..
तरीही प्रेम सोडायचं नसतं..

प्रेम म्हणजे अविचार नाही..
प्रेम म्हणजे व्यभिचार नाही..
प्रेम कधी लाचार नाही..
प्रेम अत्याचार नाही..

प्रेम ईश्वराची पुण्याई..
प्रेम शुद्धतेचा परीचायी..
प्रेम तपस्या आयुष्याची..
 प्रेम करा ऐसे वरदायि..

'प्रेम' वासना-रहित भावना..
'प्रेम' शुद्ध-पवित्र कल्पना..
'प्रेम' तुलना-हीन साधना..
'प्रेम' सेवा-भाव यंत्रणा..

प्रेम म्हणजे खरी शक्ती..
प्रेम म्हणजेच खरी भक्ती..
'प्रेम' जणू एक सुंदर उक्ती..
प्रेम मन-वैचारिक मुक्ती..

एक नाही प्रेम-परिभाषा..
प्रेम ही नित्य नवीन आशा..
आपुलकीच्या ओंजळीतुनी..
जन्म घेते प्रेम अभिलाषा..

प्रेम सागर आनंदाचा..
जया मनसोक्त पोहत जावे..
प्रेम समुद्र अमृताचा..
निज-ह्रदयी जे पाजत जावे..

प्रेम समुद्र अमृताचा..
निज-ह्रदयी जे पाजत जावे..
                                                             -भूषण जोशी