Thursday 27 November 2014

"प्रेम"

"प्रेम"

प्रेम उमळत्या फुलात वसते..
प्रेम वाहत्या झर्यात दिसते..
प्रेम ते वर निसर्गाचे जे..
प्रत्येकास अनमोल असते..

प्रेम म्हणजे आईचं हृदय..
प्रेम म्हणजे पित्याचा आधार..
प्रेम म्हणजे बहिणीची माया..
प्रेम म्हणजे मित्र उदार...

प्रेम अपेक्षा रहित असावं..
प्रेम भावने सहित असावं..
प्रेम सदा निःस्वार्थ करावं.. 
प्रेम सदा परमार्थ बनावं..

प्रेमात सदा जगायचं असतं..
प्रेमात सदा बोलायचं असतं..
कितीही मनात वादळ सुटले..
तरीही प्रेम सोडायचं नसतं..

प्रेम म्हणजे अविचार नाही..
प्रेम म्हणजे व्यभिचार नाही..
प्रेम कधी लाचार नाही..
प्रेम अत्याचार नाही..

प्रेम ईश्वराची पुण्याई..
प्रेम शुद्धतेचा परीचायी..
प्रेम तपस्या आयुष्याची..
 प्रेम करा ऐसे वरदायि..

'प्रेम' वासना-रहित भावना..
'प्रेम' शुद्ध-पवित्र कल्पना..
'प्रेम' तुलना-हीन साधना..
'प्रेम' सेवा-भाव यंत्रणा..

प्रेम म्हणजे खरी शक्ती..
प्रेम म्हणजेच खरी भक्ती..
'प्रेम' जणू एक सुंदर उक्ती..
प्रेम मन-वैचारिक मुक्ती..

एक नाही प्रेम-परिभाषा..
प्रेम ही नित्य नवीन आशा..
आपुलकीच्या ओंजळीतुनी..
जन्म घेते प्रेम अभिलाषा..

प्रेम सागर आनंदाचा..
जया मनसोक्त पोहत जावे..
प्रेम समुद्र अमृताचा..
निज-ह्रदयी जे पाजत जावे..

प्रेम समुद्र अमृताचा..
निज-ह्रदयी जे पाजत जावे..
                                                             -भूषण जोशी

No comments:

Post a Comment