Friday 28 November 2014

लेख- "Rock-star संत"

"Rock-star संत"

मित्रांनो सर्वप्रथम नमस्कार. पहिल्यांदाच एखाद्या मुद्दयावर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. चुकल्यास सांभाळुन घ्यावे. काल TV वर काही बातम्या बघितल्या आणि एक दृश्य पाहून मला हसूच आवरेना. पंजाब येथील एक संत अथवा बाबा अक्षरशः रॉकस्टार(Rock-star) सारखा सत्संग करतांना दाखविला. मोठे मोठे वूफर(Woofer), अफाट मोठे मैदान, भली मोठी गर्दी, डिस्को लाइट आणि काय काय तरी. सत्संग करताना संत भजन गातात पण इथे तर ह्या संताने सरळ रॉक-कॉन्सर्ट (Rock-Concert) सुरु केलेला. भजनाचे बोल असे होते- "यू आर माइ लव-चारजर" (You are my Love-Charger). त्याला बघून मला रणबीर कपूर चा 'Rock-star' हा सिनेमा आठवला. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अशी की तेथे सत्संगा साठी आलेले त्यांचे भक्त किंवा अनुयायी सुद्धा मोठ-मोठ्याने ओरडत गात नाचत होते. मित्रहो मी सुद्धा माझ्या आयुष्यात बरेच सत्संग ऐकिले आहेत, बरेच भजन ऐकिले आहेत, पण हा असा धांगड-धिंगा फक्त पाश्चात्य संगीता मधेच बघायला मिळतो. मला त्यांच्या त्या मॉडर्न भजनात तीळमात्र ही सातविकता आढळली नाही! मनःशांती साठी आपण भजन आणि सत्संग ऐकतो पण ह्यांच भजन ऐकून तर माझ मन पुर्ण पणे अशांत झाल. नवल वाटते अश्या बाबांच आणि त्याहून ही जास्त त्या भक्तांच जे अश्या बाबांच्या आहारी जातात. त्याच भागातला आणखी एक बाबा गजा आड गेला. तो तर सरळ सरळ 'मीच देव आहे' असे सांगत असे. इतर देवी-देवतांना मानू नका. माझीच पूजा करा ऐसे सांगत असे. काही बाबा तर त्यांच्या सत्संगा मधे बसण्या साठी पैसे(Fees) सुद्धा घेतात. असो.. ह्या बातम्या पाहून एक खात्री मात्र नक्की झाली की आजकालचे संत आणि बाबा पुढच्या पिढीला ध्यासून सत्संग करित आहेत. बहुदा त्यांना असे वाटत असावे की पुढची पिढी हे असेच रॉकिंग(Rocking) भजन आणि सत्संग पसंत करेन. आता "विट्ठला तुच माझा प्रेमस्रोत" असे शब्द ह्या नव्या पिढीला आवडणार नाहीत, "यू आर माइ लव चारजर" असेच पाश्चात्य बोल आवडतील. मित्रहो आपल्या संस्कृतीचे पाश्च्यातीकरण होऊ लागलेले आहे. तसेही नवीन पिढीला ह्या वास्तविकतेशी काहीच घेण-देण नाहीये हे मला माहित आहे पण असे भजन आणि असे स्वतहोच्चारित देवांचे सत्संग जर असेच चालत राहिले तर लवकरच आपल्या देशावर नवीन शासक शासन करतील. चांगले प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा ह्या बाबांच्या आहारी जात आहेत आणि आपली संपत्ती त्यांच्या वरून ओवाळून टाकत आहेत. आपण सर्वांनी वेळीच सावध व्हायला हवे. ह्या ढोंगी बाबांनी संत समजाला काळिमा फास्ली आहे. आपल्या येथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे थोर संत होऊन गेले आहेत. ह्यांची परंपरा आता असे ढोंगी बाबा चालवणार आहेत का? लोकांची दिशाभूल करून मनाला येईल ते त्यांच्या कडून साधून घेणे हे ह्या ढोंग्यांच कारस्थान. खरे निःस्वार्थ गुरु भेटणे हे आजच्या काळात जरी कठीण असले तरी ते अशक्य नाही. कुठल्या ही गुरु चा आदेश ऐकण्या आधी स्वताची विवेकबुद्धी वापरावी. अंध-विश्वासा पासून सावध रहावे. शेवटी आपले खरे गुरु आपणच होय. आपणच विचार करायला हवा की आपल्याला अश्या रॉकिंग संतांची गरज आहे का? एक गोष्ट लक्ष्यात असूद्या, आपल्या समस्या ह्या आपणच सोडावयाच्या असतात. कुठला ही गुरु चमत्कार दाखवून आपल्या समस्या सोडवू शकत नाही. सकारात्मक दृष्टीकोन असणे गरजेचे असते. तेव्हा जीवनात साकारत्मक रहा, आणि अश्या ढोंग्यांच्या आहारी जाउ नका. समस्येवर व्यवहारिक समाधान शोधा आणि आपले जीवन हे खरोखर rocking बनवा..
-भूषण जोशी.

No comments:

Post a Comment