Thursday 29 January 2015

"एक प्रामाणिक सल्ला.."

"एक प्रामाणिक सल्ला.."

 

एक प्रामाणिक सल्ला देतो.. लग्न अतिशय साध्या पद्धतीने करावे.. आधी कोर्ट मॅरेज करून घ्यावे.. मग काही निवडक पाहुणे मंडळीं सोबत एखाद्या मंदिरात किंवा कार्यालयात विधिवत् लग्न लावावे, आणि नंतर आपल्या इतर नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना एक छान असं रिसेप्षन (Reception) द्यावं. तसे ही आजकाल विधिवत् लग्न झाल्या नंतर ही मॅरेज सर्टिफिकेट साठी कोर्टात जावच लागते, मग ही औपचारिकता आधीच करून घ्यावी. ह्यात पैसे ही वाचतात, संबंध ही वाचतात, शिवाय फॉरमॅलिटीस(Formalities) ही पुर्ण होतात. उगाच लग्नाचा तमाशा करून वधू पक्षावर आर्थिक दडपण का टाकावे? लग्न समारंभात खर्च होणारा पैसा भविष्या साठी साठवून ठेवला तर अडी-अडचणी आल्यावर कामास पडू शकतो. लग्न म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबीयांचे मिलन. ते शांततेत आणि निश्चिंत पणे पार पडले पाहिजे. उगाच बाहेरच्यांचे रुसवे फुगवे सांभाळत बसावे लागते. कुणाला जेवण नाही आवडलं, तर कुणी नवरा-नवरी पाया नाही पडलेत म्हणून फुगतात, तर कुणी तर जसे काय आहेर घ्यायला म्हणून आलेले असतात आणि घाई गडबडीत वधू पक्ष आहेर द्यायचा विसरले तर फुगून बसतात, तर कुणी मान नाही मिळाला म्हणून रुसतात. आणि बरेच किरकोळ कारणं असतात ह्या विघ्न-संतोषी नातेवाईकां कडे लग्नाच्या गोडव्यात मीठाचा खडा पाडण्याचे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे ते राहतात बाजूलाच आणि ह्या आमंत्रितान्चेच चोचले पुरवावे लागतात. लग्नात पोट भर जेवण केल्या नंतर सुद्धा फक्त लाडू-चिवड्याची पुडी नाही दिली म्हणून आयुष्यभराचे संबंध तोडणारे डोकेफिरू नातेवाईक ही असतात. अश्या लोकांना आमंत्रण देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्या पेक्षा चार साक्षीदारान समोर कोर्ट मॅरेज करण्यात काही ही गैर नाही.

-भूषण जोशी

दिनांक -२९/०१/२०१५

No comments:

Post a Comment