Saturday 21 February 2015

"मैत्री करावी… "

 "मैत्री करावी… "

 

माणसे येती माणसे जाती..
टिकवून ठेवावी ती फक्त नाती...
कुणी हसवती कुणी रडवती..
तरी हक्काने मित्र म्हणवती..

 

प्रेम घ्यावे प्रेम द्यावे..
सगळ्यांनाच आपलेसे करावे..
लागले कधी जरी भांडावे..
तरी विषय प्रेमाने मांडावे..

 

एकदाच जीवन हे मिळते..
हवे तितके मन जोडावे..
कधी हसावे कधी रूसावे..
रंग हे ही चाखून पहावे..

 

हीच तर मजा खरी मैत्रीची..
मित्राच्या शिव्या ही गोड वाटावे..
हक्काने पुन्हा शिव्या ही द्यावे.
पण हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे..

                                                                         -भूषण जोशी

No comments:

Post a Comment