माझे अनुभव…
|| हर हर महादेव || ॐ नम: शिवाय ||
(दिनांक -१७/०२/२०१५)
आज महाशिवरात्रीचा पर्व आहे पण पहाटे माझी झोप ही मंदिरातल्या भजनांनी नव्हे तर मस्जीदितल्या आझाण ने मोडली. थोडं आश्चर्यच वाटले पण असो. तेथे सुद्धा देवालाच हाक मारली जाते फक्त भाषा आणि पद्धत वेगळी असते. मुख्य म्हणजे मी वेळेवर जागा झालो. असो. माझ्या घरा जवळच तापी नदीच्या काठी कपीलेश्वर महादेवाचे फार पुरातन मंदीर आहे. आत्ताच दर्शन घेउन आलो. छान वाटते.
- भूषण जोशी
लहानपणीचा एक किस्सा…
(दिनांक -०३/०२/२०१५)
ha ha..आज लहानपणीचा एक किस्सा आठवला.. मी लहानपणी आमच्या घरी आलेल्या
पाहुण्यांना आधी विचारायचो "तुम्ही परत कधी जाणार?" खूप वेळा ओरडा बसलाय
मला माझ्या ह्या वाईट सवई मुळे लहानपणी. काही चपळ पाहुणे हसून विषय बदलून
देत.. "बाळ तुझा अभ्यास कसा "चाललाय"? मग काय मी गप्प.. गुपचूप सटकायचो
तेथून. मी सुद्धा पाहुण्यांना असे ह्याच हेतू ने विचारायचो की त्यांनी बरेच दिवस
रहावे.. कारण ते थांबले तितके दिवस शाळेला दांडी मारता यायची..
-भूषण जोशी
No comments:
Post a Comment