Monday 5 January 2015

लेख- एक विचार.. राष्ट्रमाता कोण?

एक विचार.. राष्ट्रमाता कोण?

 

मित्रांनो महात्मा गांधींना "राष्ट्रपिता" म्हणून संबोधलं जाते. अश्या वेळेला बहोतेकांना प्रश्न पडतो की जर महात्मा गांधी हे "राष्ट्रपिता" आहेत तर मग "राष्ट्रमाता" कुणाला म्हणावं? बरेच लोक आपापल्या विचारानुसार कुणाला न कुणाला राष्ट्रमाता मानत असतात किंवा आहेत. पण मला असं वाटतं कि जर देशासाठी झुंझणार्‌याला ही पदवी मिळू शकते तर मग आपल्या बाळाला देश-रक्षणा साठी सीमेवर पाठवणार्या त्या "आई" ला "राष्ट्रमाता" का म्हणू नये? राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि असे कित्येक उदाहरणं आपल्याला इतिहासात पहायला वाचायला मिळतात. ह्या विरांगना स्वतःच्या बाळा सहित युद्धात उतरल्या होत्या. त्या काळातल्या राष्ट्रमाताच म्हणावं त्यांना.. असेच आजच्या काळातल्या "राष्ट्रमाता" ह्या त्या वीर सैनिकांच्या जननीच आहेत जे सैनिक सीमेवर शत्रूंशी लढता-लढता आपले प्राण सुद्धा गमावतात. प्रत्येक स्त्री साठी तिचं लेकरू हेच तिचे प्राण असते. पण ह्या वीर माता त्यांच्या पोटाचा गोळा हसत-हसत देशावर ओवाळून टकतात. माणूस एक वेळ स्वतःला मरणात लोटू शकतो पण आपल्या बाळाला नाही. ह्यावरूनच ह्या वीर मात्यांचे त्याग किती महान आहे ह्याची प्रचेति आपल्याला येते. अश्या महत्त्यागिनींना "राष्ट्रमाता" म्हणून संबोधणे सर्वथा योग्य आहे असे माला वाटते. सीमेवर लढणार्या प्रत्येक सैनिकाची आई ही त्या देशाच्या देशवासियां साठी राष्ट्रमाताच आहे, कारण तिचं लेकरू त्यांच्या रक्षणा साठी सीमेवर उभं असते म्हणून ते देशात सुखानी नांदू शकता. तेव्हा माझ्या मते तरी देशासाठी लढणारा प्रत्येक जण हा राष्ट्रपिता आणि देशावर हसत-हसत आपलं लेकरू ओवाळून टाकणारी प्रत्येक आई ही राष्ट्रमाताच आहे.

-भूषण जोशी

दिनांक : ०५-०१-२०१५

1 comment:

  1. भुषण खरं आहे...तुझं.....

    ReplyDelete