Thursday 22 January 2015

"मित्र असा नसावा.."

"मित्र असा नसावा.."

एकदा जुना मित्र भेटला..
जवळ येऊनी मला खेटला..

काय कसा आहेस? बर्याच दिवसानी?
प्रश्न मारिले नेमुनी त्यानी ..

बरा आहे.. निवांत आहे..
उत्तरलो मी त्यास ऐकूनी..

तू कसा आहेस? काय करतोस?
हर्षित मनाने मी प्रश्न केले..

चमकला चेहरा त्याचा सूर्या वानी..
सुंदर हास्य त्याच्या मुखी आले..

मोठ्या कंपनीत रोजगार आहे..
मला ५०,००० पगार आहे..

नुकताच फ्लॅट बुक करून आलो..
नवीन गाडी ही तयार आहे..

सांगू लागला मग ऐठीत तो..
घेउ लागला मज मिठीत तो..

मला ही जाणुनी आनंद झाला..
मी ही हसून त्याच्या मिठीत आला..

तुझं काय चालू आहे भावा..
घेतलास का नाही बंगला नवा..

हसलो मी त्याचे प्रश्न ऐकूनी..
बोललो अरे आलोय जग जिंकुनी..

ऐकून चकित जरा तो झाला..
"खरं बोल" मला तो म्हणाला..

थट्टा करतोय रे मी तुझी..
नोकरी सोडलीये मी माझी..

ऐकूनी तो जरा शांत झाला..
जणू काही तेथे एकांत झाला..

मग काय करतोय आजकाल तू?
झालायेस का घराचा द्वारपाल तू?

हसलो मी पण गम्मत समझुन..
हो रे म्हणालो हात बांधून..

तितक्यात एक बदल झाला..
दोन पाउलं तो मागे गेला..

रिकामा आणि बेकार आहेस तू ?
का अजून बेरोजगार आहेस तू..?

एका मागून एक जणू बाण खुपसले..
हृदय जणू पचकन पिचकले..

हो रे भावा असच समझ तू..
गरिबीत ह्या माझी गरज तू..

जाणे अचानक त्यास काय झाले..
जाणे कुणाचे फोन आले..

हात त्यानी माझा झटकला..
पाठ दाखवून लगेच सटकला..

तेथेच उभा राहिला मी..
त्याला जातांना पहिला मी..

काय जाणे त्यास काय वाटले..
पण माझे तर हात पाय दाटले..

तुटलेलं हृदय मोडलेलं मन मी वेचलं..
स्वतःला निराशेतून बाहेर खेचलं..

असा तो का वागला काहीच कळेना..
प्रश्न बरेच पण उत्तर मिळेना..

कोठे त्याला घ्यायची भरारी होती ?
त्याला पळवणारी काय माझी बेकारी होती ?

खरं सांगितलं म्हणून का तू पळाला?
का मग माझा जीव जळाला?

अरे तुला काही मी मागत नवतो..
माझी व्यथा तुला मी सांगत होतो..

असो रहा सुखी दोष नाही रे तुझा..
दोषी स्वाभिमान असंतोष हा माझा..

नसता भेटलास तरी चाललं असतं..
मन माझं अस दुखावलं नसतं..

                                                                         -भूषण जोशी

No comments:

Post a Comment