"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Monday, 27 April 2015
Sunday, 19 April 2015
"विचार माझे कुठे हरवले.. "
"विचार माझे कुठे हरवले.. "
शब्द का रुसले माझ्यावर..
लेखन माझे कुणी पळवले..
सुचे न काही किती चिंतुनी..
विचार माझे कुठे हरवले..
मित्रवत मज विचार माझे..
नकळत माझ्या कुणी लपविले..
निराशेची ठिणगी पडता..
असतील का ते जळूनी गेले..
शोधूनी मज ते सापडतील का..
महत्व मज त्यांचे जाणवले..
माझेच होते का सोडूनी गेले..
विचार माझे कुठे हरवले..
-भूषण जोशी
Sunday, 5 April 2015
"जन्मदिवस.."
"जन्मदिवस.."
जन्मदिवस सुरुवात निज जीवनाची..
जन्मदिवस सुरुवात आईच्या आईपणाची..
आनंदाने प्रफुल्लित बापाच्या मनाची..
कुळास वाढविणार्या नवीन वंशांकुराची..
सुरुवात आजोबांच्या पुनर्जन्माची....
सुरुवात आजीच्या नवीन वात्सल्याची....
दिवस मोठा खरा तो आई साठी..
अविस्मरणीय आनंद तो बापा साठी..
साक्षीदार क्षण तो दोघांच्या प्रेमाचा..
कारण तो दोघांना जगण्या साठी..
-भूषण जोशी
Subscribe to:
Posts (Atom)