Thursday, 20 June 2024

जय जय शिव छत्रपति..



हर हर महादेव चा झाला उद्घोष..
सहयाद्रीने सुद्धा केला जयघोष..

लेक मायभूमीचा अवघ्यास रक्षति..
आला या पुण्यवान धरतीचा भूपति..
जय जय शिव छत्रपति.. जय जय शिव छत्रपति.. 🙏🙏🚩🚩

रयतेचा श्वास तो रयतेची आस तो..
रयतेचा बाप घेई शत्रुंचा घास तो..
राजा तो नरपति राजा तो गजपति..
राजा तो पशुपति राजा तो अधिपति..
जय शिव छत्रपति.. जय जय शिव छत्रपति.. 🙏🙏🚩🚩

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏🙏🚩🚩🚩

- भूषण जोशी

No comments:

Post a Comment