Thursday, 20 June 2024

जय जय शिव छत्रपति..



हर हर महादेव चा झाला उद्घोष..
सहयाद्रीने सुद्धा केला जयघोष..

लेक मायभूमीचा अवघ्यास रक्षति..
आला या पुण्यवान धरतीचा भूपति..
जय जय शिव छत्रपति.. जय जय शिव छत्रपति.. 🙏🙏🚩🚩

रयतेचा श्वास तो रयतेची आस तो..
रयतेचा बाप घेई शत्रुंचा घास तो..
राजा तो नरपति राजा तो गजपति..
राजा तो पशुपति राजा तो अधिपति..
जय शिव छत्रपति.. जय जय शिव छत्रपति.. 🙏🙏🚩🚩

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏🙏🚩🚩🚩

- भूषण जोशी

Wednesday, 19 June 2024

मी एक अस्पृश्य ब्राह्मण ?

 मी एक अस्पृश्य ब्राह्मण ?

समस्त ब्रम्हवृंदाला माझा नमस्कार, आपणा समोर एक विषय मांडायचा होता. काही दिवसांपूर्वी मला माझ्या एका जवळच्या  "नॉन-ब्राम्हण" मित्राचा फोन आला. हा मित्र मूळचा मध्य प्रदेश चा. शिक्षण घेण्यासाठी म्हणून तो महाराष्ट्रात आला होता. तेव्हाच आमची ओळख झाली. गळ्याने अतिशय मधुर असल्या मुळे आणि मला देखील गायनाची आवड असल्यामुळे आमची मैत्री अजूनच घट्ट झाली. देवाने कलागुण देताना त्याची जात बघितली नव्हती. गायनामध्ये अतिशय तरबेज असलेला माझा हा मित्र एका IT कंपनी मध्ये काम करू लागला. एके दिवशी त्याचा मला फोन आला. फोनवर तो मला विचारू लागला - "भूषण ! तू कोणत्या शाखेचा ब्राम्हण आहेस ?" मी म्हणालो का रे बाबा? तुला हा प्रश्न का पडलाय ?

तो म्हणाला - " आरे मला आत्ताच कळाले आहे कि तुमच्यातही अस्पृश्यता आहे ! तुम्ही सुद्धा शाखा भेद करतात ! " 

मी जरा वेळ शांत झालो आणि म्हणालो- "असे काही नाहीये रे. तुला कुणी सांगितलं ?" 

त्यावर त्याने मला त्याच्या ऑफिस मधला एक किस्सा सांगितला. कुणीतरी "काटदरे" आडनावाचा त्याचा सहकर्मचारी आहे. एके दिवशी बोलता-बोलता सहज विषय निघाला. 

चौधरी बुवा (म्हणजे माझा मित्र) काटदरेंना म्हणाले- "तुम्ही कुठल्या कास्ट चे आहात? तुमचे आडनाव कधी ऐकलेले नाही !" 

त्यावर काटदरे बुवा म्हणाले- "आम्ही ब्राम्हण आहोत." 

चौधरी बुवा खुश होऊन म्हणाले- "अरे वाह! छानच कि! माझा एक बेस्ट फ्रेंड आहे तो पण ब्राम्हण आहे!"

काटदरे बुवा म्हणाले -"हो का ! काय आडनाव त्याचे?" 

चौधरी बुवा म्हणाले -" जोशी !" त्यावर काटदरे बुवा नाक मुरडत म्हणाले - " जोशी होय? यजुर्वेदी ! भिकारचोट असतात ही लोक !" 

हे ऐकून माझ्या मित्राला धक्काच बसला! तो म्हणाला - " का हो? असे का म्हणताय तुम्ही? तुम्ही सुद्धा ब्राह्मणच आहात की ? " 

यावर काटदरे बुवा मोठ्या तोर्याने म्हणाले - "आम्ही ऋग्वेदी ब्राम्हण ! आम्ही श्रेष्ठ आहोत ! इतर सर्व शाखा आमच्या खाली ! " 

माझा मित्र त्यांचे उत्तर ऐकून अवाकच झाला! त्याला कळेच ना काय बोलावे ते! आणि ही सगळी चर्चा एका IT कंपनी मध्ये बसून चाललीये! 

असो. माझा खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याला माझ्या बद्दल वाईट वाटलं. त्याने ताबडतोप मला फोन केला आणि माझी शाखा विचारली. मला म्हणाला भूषण ! मला फक्तं जातीय अस्पृश्यता माहित होती. आमच्या गावात आजही ती पाळली जाते. तुझ्यात मला ती भावना कधीच दिसली नाही. तू माझ्याशी कधीही अस्पृश्यतेने वागला नाहीस. आपण एकमेकांच्या घरी येणेजाणे करायचो. सोबत जेवायला बसायचो. तुझी आई तर इतक्या प्रेमाने जेवायला वाढायची कि मला कधी कळलेच नाही कि मी एका ब्राम्हणाच्या घरी जेवतोय जे माझ्या गावात आजही शक्य नाही. पण आज अचानक असे वाटले कि तू सुद्धा आमच्यातलाच एक आहेस. इतर सवर्णी लोक जे आमच्या सोबत वागतात ते इथे तुमचेच लोक तुमच्या सोबत वागत आहेत ! हे आश्चर्यकारक आहे ! 

आता यावर मी त्याला काय उत्तर द्यावे हे माझे मलाच कळे ना ! मी म्हणालो- " आरे सगळेच तसे नाहीयेत ! काही निवडक असतात जे सगळ्या ठिकाणी आढळतात. आपण दुर्लक्ष करायचं. 


हा होता आमच्यातील संवादाचा अंश. आता मला असा प्रश्न पडलाय कि जे लोक स्वतःला ऋग्वेदी म्हणवतात आणि मोठ्या तोर्याने समाजात मिरवतात त्यांना ऋग्वेदा बद्दल अशी कितीशी माहिती आहे? त्यातील एक तरी ऋचा तोंडपाठ आहे का यांच्या? असो. तो त्यांचा विषय. माझा मुख्य प्रश्न असा कि हा शाखा भेद अजूनही आपल्यात आहे का? किंबवणा का आहे? अजूनही आपण एकमेकांना हीन दृष्टीने बघतो का? किंबवणा का बघतो? मी यजुर्वेदी शाखेचा आहे म्हणून मी कमी ब्राम्हण झालो काय? आणि हे ऋग्वेदी शाखेचे लोक जास्त ब्राम्हण असतात काय? मुळात जिथे आपण हिंदू म्हणून एकत्र यायला हवं तिथे जातीय भेद तर सोडा, शाखेवरून भेद सुरु आहेत ! अश्याने परकीय शक्तिंसमोर कसा टिकाव लागणार आहे आपला? आपल्या अश्या वागण्या मुळे धर्म टिकेल का? का लोक हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारताय?


माझ्याच देशात माझ्याच जातीत मी एक अस्पृश्य ब्राम्हण म्हणून जगायचे आहे का? कृपाकरुन कुणीतरी सुज्ञ व्यक्ती असेन तर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही मनापासुन विनंती आहे !


-भूषण जोशी 


Saturday, 21 September 2019

झूठे सुख से मुझे दोस्तों.. सच्चा दुख अधिक भाता है.. 

झूठे सुख से मुझे दोस्तों.. सच्चा दुख अधिक भाता है.. 
झूठे सुख से मुझे दोस्तों.. सच्चा दुख अधिक भाता है.. 
क्योंकि झूठे सुख का सच.. जब भी सामने आता है..
वह सच्चे दुख से भी अधिक.. रंजोदर्द दे जाता है...
उस रंजोदर्द को दोस्तों नहीं हर कोई झेल पाता है.. 
झूठे सुख से मुझे दोस्तों.. सच्चा दुख अधिक भाता है.. 

बड़ा हूँ मैं तो बड़ा कहो.. छोटा हूँ गर तो छोटा कहो.. 
दुबला हूँ मैं तो दुबला कहो..मोटा हूँ गर तो मोटा कहो..
गोरा हूँ मैं तो गोरा कहो..काला हूँ गर तो काला कहो..
दुश्मन हूँ मैं तो दुश्मन कहो..दोस्त हूँ गर तो हमप्याला कहो..
झूठी प्रशंसा से अधिक आनंद..सच्ची निंदा में आता है.. 
झूठे सुख से मुझे दोस्तों.. सच्चा दुख अधिक भाता है.. 

चिंता ना करो झेल चुका हूँ मैं.. 
चिंता ना करो झेल चुका हूँ मैं.. 
बाण कई कटाक्षों के..
तीर कई तानों के.. 
झेल चुका मैं भाले भी कई..
अपनों ने किये अपमानों के.. 
अब तो दिलेनादान मेरा ये..
गैरों की तलवारें भी हंसकर झेल जाता है.. 
झूठे सुख से मुझे दोस्तों.. सच्चा दुख अधिक भाता है.. 

Saturday, 14 September 2019

Ganesh Festival

🌺Ganesh Festival 🌺

Pardon me for being so philosophical but we have to understand the philosophy or the real thought behind this larger than life festival. Huge tents, beautiful decorations, huge idols doesn't justify the celebration of Ganesh Festival.
                          We have to understand that festivals are meant to spread light and happiness among the communities of people not to disturb the harmony of the nature. Sightings of the Ganesh Visarjan are not so delightful. It personally hurt me when I see the beautiful Ganesh Idols being broken and damaged, or half- dissolved, lying on the sea shores or on dried rivers.
                       Lord Ganpati is the most beautiful and cute deity among all the other deities. We should make sure that we should not destroy or distort the idols of such a beautiful deity that too after welcoming and worshipping with full devotion for 10 days. The idols made from pop are insoluble and pollute the water. Lord Ganesh himself would never like to see his idols polluting the water.
                   Though we are nobody to bring the Almighty into our house or take him out. We can just pretend by bringing in the Pratima (Idol) or a Statue of the Sukhkarta Lord Ganesha into the place we call our home. But in reality we are living in the world created by him.
                   So it is indeed his home. We are living in his home. Though it's just a ritual started with a motive to bring people from different castes & groups together to celebrate the festival in order to spread the message of fighting the evils together and establishing unity thereof, I believe that is the only important ritual which should be followed with more devotion.

🌺Om Namah Ganeshay 🌺

-Bhushan Joshi

Sunday, 5 August 2018

दोस्ती मेरी नजर से..

दोस्तों से होती है दोस्ती ये यारों..
दोस्ती से ही तो बना दोस्ताना.. 
हर एक रिश्ता बेशक होता ॲहम है..
मगर सबसे पेहले दोस्ती तुम निभाना..

दुनिया तरक्की के आसमाँ को छू ले..
बिना दोस्ती के है अधुरा जमाना.. 
जमाने से कभी दोस्ती ये नहीं है..
दोस्ती से होता है सारा जमाना..

रिश्तों में ऐसा रिश्ता है दोस्ती..
दुआओं से भरा गुलदस्ता है दोस्ती..
जेहेनो-गहराई में बसा लो इसे तुम..
कि अंधेरे से रोशनी का रास्ता है दोस्ती..

गाता हूँ हर वक्त यही इक फसाना.
खुशियों कि बुलंदियां जरुर छू कर आना..
मगर जब कभी भी हो गम को भुलाना.. 
ऐ दोस्तों! इस दोस्त को जरूर बुलाना..
ऐ दोस्तों! इस दोस्त को जरूर बुलाना..

आप सभी का दोस्त,
भूषण जोशी.

Saturday, 12 August 2017

पहिल्यांदा तुला मी बघितले..

पहिल्यांदा तुला मी बघितले..
बघताच तुझ्यात हरपलो..
तुजला बघता बघता मी..
स्वर्गात जणू गं पोहोचलो..

सुंदर तुझिया त्या छवीला..
हृदयात लगेच मी टिपले..
स्मित हास्य बघुनी तुझिया..
डोळे माझे ही दिपले..

तव स्पर्श तो होता अल्गद ..
अजुनी मजला अनुभवतो..
क्षण तो पहिल्या भेटीचा..
विसरता तरी नं विसरतो..

भासते स्वर्ग अपसरा जणू..
बोलते गोड कोकिळा जणू..
डोळ्यात तुझ्या हरपुन जाई..
माझी अवघी दुनियाच जणू..

-भूषण जोशी

Sunday, 16 July 2017

प्रत्येक क्षणात तुला मी..

प्रत्येक क्षणात तुला मी..
हृदयापासून गं स्मरतो..
तुझिया स्मरणात मी असता..
स्वतहाचे भान विसरतो.

डोळ्यांत तुझ्या देखुनि..
हृदयात तुझ्या झाकावे..
बुडुनी प्रेमात तुझ्या गं..
जग सारे विसरून जावे..

प्रेमास सार्थ करण्यासं..
जवळी तुझिया मी यावे..
तुजला मिठीत घेवुनी..
अंतर सारे मिटवावे..

तुझिया ओठांची गोडी..
चाखावीशी मज वाटे..
केसांच्या मधुनी तुझिया..
फिरवावी माझी बोटे..

पावसाळी ह्या दिवसातं..
जणू प्रेमसुधा बरसावे..
त्या प्रेमसुधेच्या रसात..
दोघांनी भिजून जावे..

-भूषण जोशी