Monday 28 March 2016

एक अनुभव

दिनांक :- २८/०३/२०१५

आज "रामनवमी" चा पर्व, प्रभु श्री रामांचा जन्म आजच्याच तिथी वर झाला अशी मान्यता आहे.. ऑफीस वरून आल्या नंतर आज सायंकाळी मंदिरात गेलो.. जाताच आरती सापडली.. एक मुलगा निरांजनी अगदी माझ्या समोरच घेऊन आला.. मी सुद्धा लगेच आस घेतली.. खूप छान वाटलं.. अगदी देव प्रसन्न असल्या सारखं वाटलं.. आता काही तथाकथित सेक्युलर पुरोगाम्यांना ह्यात अंधश्रद्धा, अर्थहिनता, देवभोळेपणा वगैरा दिसेल.. पण माझ्या मते मला ह्या मुळे खूप साकारात्मकता मिळाली.. मन प्रसन्न झाले.. हृदयाने नेहमी पेक्षा जास्त रक्त माझ्या शरीरात पंप केले.. Stress एका क्षणात नाहीसा झाला.. Mood एकदम fresh झाला.. खूप आनंद अनुभव करत आहे.. आणि मला वाटते ह्या साठीच आपण देवाच्या दारी जात असतो.. देव काही प्रत्यक्ष तेथे अवतरत नाही पण ह्या रूपे तो आपल्याला त्याच्या असण्याची जाणीव करून देतो.. अर्थातच कुठला दिव्यप्रकाश तेथे दिसत नसला तरी ही वातावरणातील सकारात्मक उर्जा आपल्या मनाला पुर्ण पणे शांत करून आपल्या मेहेंदू वरील तणावाला दूर करते.. त्या साठी कुठलीच टॅबलेट किंवा कॅप्सूल घ्यावी लागत नाही.. असो.. एवढं सांगण्या माघचा हेतू म्हणजे एवढाच कि आपली संस्कृती ही नुसतीच मान्यातेंवर नव्हे तर ताथ्यांवर आधारित आहे.. आणि म्हणून मला माझ्या संस्कृती वर आणि माझ्या आस्तिकते वर गर्व आहे..

जय श्री राम..  

-भूषण जोशी

No comments:

Post a Comment